​मृणाल दुसासीन गेली सुट्टीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 14:40 IST2017-04-03T09:10:25+5:302017-04-03T14:40:25+5:30

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत मृणाल दुसानीस प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले ...

Mrinal Dasasin on the last holiday | ​मृणाल दुसासीन गेली सुट्टीवर

​मृणाल दुसासीन गेली सुट्टीवर

्सं सासर सुरेख बाई या मालिकेत मृणाल दुसानीस प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या मालिकेत एक आज्ञाधारक सून, पत्नी या भूमिकेत प्रेक्षकांना तिला पाहायला मिळत आहे. 
मृणाल या मालिकेत विवाहित दाखवली असून तिच्या पतीसोबतचे तिचे नाते खूपच चांगले आहे. मृणाल खऱ्या आयुष्यातदेखील विवाहित असून गेल्याच वर्षी तिचे लग्न झाले आहे. अस्सं सासर सुरेख बाई ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच दिवसात तिने अमेरिकास्थित नीरज मोरेशी लग्न केले. नाशिकमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत तिने लग्न केले. नीरज हा मुळचा पुण्याचा असून सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मृणाल आणि त्याची भेट लॉस एंजिलिसमध्ये झाली होती. लॉस एंजिलिसला महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त मृणाल गेली असता नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद वाढला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अमेरिकतून एमएस केल्यानंतर नीरज आता लॉस एंजिलिस येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. पुढची किमान दोन वर्षं तरी तो अमेरिकेतच राहणार असल्यामुळे मृणालही तिची मालिका संपल्यावर अमेरिकेत जाणार आहे.
मृणाल आणि नीरज यांचे लग्न झाल्यापासून मृणाल मालिकेत व्यग्र असल्याने तिला नीरजला वेळच देता येत नाहीये. त्यामुळे आता मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून मृणाल नवऱ्याला भेटायला अमेरिकेला गेली आहे. तिने यासाठी मालिकेच्या टीमकडून तब्बल एक महिन्याची सुट्टी घेतली आहे. तिने जायच्या आधी काही भागांचे चित्रीकरण केल्यामुळे ती भारतात नसली तरी प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. 



Web Title: Mrinal Dasasin on the last holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.