सामाजिक विषयांवर चित्रपट पाहिजेत : अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:31 IST2016-01-16T01:08:38+5:302016-02-12T04:31:01+5:30
सध्या मराठीत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. लहान मुलांचे भावविश्व उलगडणारा, सामाजिक विषयांवर भाष्य करणारा.. असे अनेक चित्रपट ...
.gif)
सामाजिक विषयांवर चित्रपट पाहिजेत : अमोल कोल्हे
स ्या मराठीत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. लहान मुलांचे भावविश्व उलगडणारा, सामाजिक विषयांवर भाष्य करणारा.. असे अनेक चित्रपट समाजात जागरूकता निर्माण करण्याचे मोठे काम करीत आहेत.
जोगवा, फँड्री, किल्ला, कोर्ट हे त्यापैकीच काही. असाच अजून एक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा चित्रपट येत आहे 'मराठी टायगर्स.' या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या विषयाबद्दल कोल्हे सांगतात, या चित्रपटाची कथा बेळगाव जिल्ह्यात सुरू होते. बेळगाव सीमारेषेवर राहणार्या नागरिकांवर हा चित्रपट आधारित आहे. इतकेच नाही तर बेळगावप्रमाणेच निपाणी, संकेश्वर अशा महाराष्ट्रात मोडणार्या मात्र कन्नड नागरिकांकडून तेथील मराठी नागरिकांवर केल्या जाणार्या अत्याचारांवरही हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे; मात्र या माध्यमातून समाजात एक जागरूकता निर्माण करण्याचा या चित्रपटाचा हेतू आहे आणि महाराष्ट्रातील नागरिक या चित्रपटाचे निश्चितच स्वागत करतील, अशी मला खात्री आहे. त्यामुळे असे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे चित्रपट व्हायला पाहिजेत.