डोंबिवली फास्टचा दिग्दर्शक बनवणार प्रेमकथेवर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 23:07 IST2017-01-26T17:37:36+5:302017-01-26T23:07:36+5:30

सैराट, टाइमपास, ती सध्या काय करते यासारखे अनेक रोमँटिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. ती सध्या काय ...

The movie will be directed by Dombivli Fast | डोंबिवली फास्टचा दिग्दर्शक बनवणार प्रेमकथेवर चित्रपट

डोंबिवली फास्टचा दिग्दर्शक बनवणार प्रेमकथेवर चित्रपट

राट, टाइमपास, ती सध्या काय करते यासारखे अनेक रोमँटिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. ती सध्या काय करते हा चित्रपट तर सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवयोय. 
प्रेम कथांवर आधारित असलेल्या चित्रपटाची सध्या चलती असल्याने आगामी काळात मराठीत प्रेम कथांवर आधारित अनेक चित्रपट येणार आहेत.
डोंबिवली फास्ट सारखा अतिशय गंभीर चित्रपट बनवणारे निशिकांत कामतदेखील एक प्रेमकथेवर चित्रपट बनवणार आहेत. सध्या तरी ते कथेवर काम करत असल्याने त्यांनी या चित्रपटाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
निशिकांत कामतने छोट्या पडद्यापासून स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे त्यानंतर ते चित्रपटांकडे वळले. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित करण्यासोबतच सातच्या आत घरात सारख्या चित्रपटात काम देखील केले आहे. पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या फुगे या चित्रपटात ते एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. फुगे या चित्रपटाच्या दिगदर्शिका स्वप्ना वाघमारे या निशिकांतच्या खूप चांगल्या फ्रेंड आहेत. त्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी विचारल्यावरत्यांनी क्षणात या चित्रपटासाठी होकार दिला. स्वप्नील जोशी, सुबोध भावे आणि स्वप्ना ही सगळी मित्रमंडळी असल्याने चित्रपटाचे चित्रीकरण करतोय असे वाटलेच नाही, मज्जा मस्तीत चित्रिकरण पूर्ण केले असे ते सांगतत.
निशिकांत अभिनय देखील करत असले तरी त्याचे पहिले प्रेम हे दिग्दर्शन आहे आणि त्याचमुळे ते सध्या एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. या प्रोजेक्टची ते घोषणा कधी करतत हे काहीच दिवसात कळेल.

Web Title: The movie will be directed by Dombivli Fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.