माणची सुकन्या व आंतरराष्ट्रीय धावपटु ललिता बाबर हिच्या मोही ते रिओ आॅलम्पिक प्रवासावर आधारीत लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ...
माणदेश एक्सप्रेसवर लघुचित्रपट
/>माणची सुकन्या व आंतरराष्ट्रीय धावपटु ललिता बाबर हिच्या मोही ते रिओ आॅलम्पिक प्रवासावर आधारीत लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दुष्काळी माण तालुक्यातील मोही गावची रहिवासी असणारी ललिता हिचा रिओ आॅल्मपिक पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. तिचा हा प्रवास महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना कळवा व त्यातुन त्यांनी आदर्श घ्यावा यासाठी माणचाच एक युवा दिग्दर्शक व निर्माता प्रसाद माने याने ललिताच्या जिवनावर लघुचित्रपट बनवण्याचा विडा उचलला. या लघुचित्रपटासाठी आघाडीचा गायक जसराज जोशी याने गाणे गायले आहे. नुकतेच या लघुचित्रपटाचा शुभारंभ म्हसवड येथील क्र ांतीवीर शैक्षणिक संकुलात करण्यात आला. या लघुचित्रपटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले.