मयुरी आणि पियुष जानेवारीमध्ये अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 12:40 IST2016-12-03T12:38:35+5:302016-12-03T12:40:13+5:30
मराठी इंडस्ट्रीमध्ये लग्नसराईचे दिवस चालू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत असल्याचे पाहायला मिळत ...

मयुरी आणि पियुष जानेवारीमध्ये अडकणार विवाहबंधनात
म ाठी इंडस्ट्रीमध्ये लग्नसराईचे दिवस चालू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, अभिनेता चिराग पाटील, गौरव घाटणेकर, मृण्ययी देशपांडे, श्रुती मराठे यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री मयुरी वाघदेखील विवाहबंधनात अडकणार आहे. ती अभिनेता पियुष रानडेसोबत जानेवारीमध्ये लग्न करणार असल्याचे समजत आहे. या दोघांनी ही आपली नवीन इनिंग नवीन वर्षाच्या सुरूवातीला चालू करण्याची ठरवली असल्याचे समजत आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा केला आहे. त्याचबरोबर मयुरी ही सध्या लग्नाच्या तयारीला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. मयुरी आणि पियुष यांची अस्मिता या मालिकेमधून मैत्री सुरू झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. मयुरी ही सध्या अस्मिता या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तर पियुष रानडेदेखील या मालिकेत पाहायला मिळत आहे. त्यांची ही रील लाईफ जोडी रियल लाईफमध्ये उतरणार आहे. पियुष नुकताच लाल इश्क या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा होता. तसेच या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशीदेखील पाहायला मिळाला आहे. तसेच मयुरी ही वचन दिले तू मला, ही वाट दूर जाते, या वळणावर कॉमेडी एक्सप्रेस, मेजवानी, सुगरण अशा अनेक मालिकांमधून पाहायला मिळाली. तसेच तिने मन्या द वंडर बॉय हा चित्रपटदेखील तिचा प्रदर्शित झाला आहे. दोघांची ही जोडी वास्तवातपण एकत्रित येत असल्याने त्यांच्या चाहत्यांनादेखील नक्कीच आनंद झाला असणार हे मात्र नक्की.