एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:50 AM2021-06-15T11:50:13+5:302021-06-15T14:14:00+5:30

नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. हीच मागणी या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती.

Mayuresh Kotkar, Marathi Artist, Arrested For Allegedly Posting Objectionable Statement Against State Minister Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आली होती.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तीला नुकतीच अटक करण्यात आली आली आहे. हा व्यक्ती एक अभिनेता असून याचे नाव मयुरेश कोटकर आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी मयुरेशला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. मयुरेशनेसुद्धा हीच मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. त्याने फेसबुकवर त्याबाबत अनेक पोस्ट केल्या होत्या. 


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आली होती. ही गोष्ट वागळे इस्टेटमधील शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या विरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असता कोटकरला अटक करण्यात आली.  त्यानंतर पोलिसांनीच फेसबुकवरून हा आक्षेपार्ह मजकूर डिलीट केला.

Web Title: Mayuresh Kotkar, Marathi Artist, Arrested For Allegedly Posting Objectionable Statement Against State Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.