मराठमोळ्या 'ज्युलिएट'नं जिममध्ये वर्कआउट करत नेटकऱ्यांचं वेधून घेतलं लक्ष; पाहा वैदेही परशुरामीचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:00 AM2023-02-22T06:00:00+5:302023-02-22T06:00:00+5:30

Vaidehi Parshurami : वैदेहीचा 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात वैदेही ज्युलिएटच्या तर जग्गूच्या भूमिकेत अमेय वाघ पाहायला मिळाला.

Marathmoli 'Juliet' caught the attention of netizens while working out in the gym; Watch this video of Vaidehi Parasurami | मराठमोळ्या 'ज्युलिएट'नं जिममध्ये वर्कआउट करत नेटकऱ्यांचं वेधून घेतलं लक्ष; पाहा वैदेही परशुरामीचा हा व्हिडीओ

मराठमोळ्या 'ज्युलिएट'नं जिममध्ये वर्कआउट करत नेटकऱ्यांचं वेधून घेतलं लक्ष; पाहा वैदेही परशुरामीचा हा व्हिडीओ

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. वैदेहीचा 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात वैदेही ज्युलिएटच्या तर जग्गूच्या भूमिकेत अमेय वाघ पाहायला मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. दरम्यान नुकतेच वैदेही परशुरामी हिने इंस्टाग्रामवर जिममधील वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वैदेही परशुरामी हिने इंस्टाग्रामवर जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. चाहते तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर एका युजरने लिहिले की, तुला व्यायाम करायची काहीच गरज नाही आहे.. तू पहिलीच खूप फिट आहेस. तर दुसऱ्या युजरने लिहिले की,  तू स्वर्गात ली अप्सरा आहेस, सुंदर.

जग्गू आणि ज्युलिएट चित्रपटात कोळीवाड्याचा लाडका जगदीश उर्फ जग्गू आणि अमेरिकेतल्या चितळ्यांची इंग्रजाळलेली जुलिएट यांची भन्नाट प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह हे कलाकार झळकले आहेत.

Web Title: Marathmoli 'Juliet' caught the attention of netizens while working out in the gym; Watch this video of Vaidehi Parasurami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.