मराठी सिनेमा पोहचला परदेशी लोकेशन्सवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 17:17 IST2016-09-08T11:47:54+5:302016-09-08T17:17:54+5:30

तुटपुंज बजेट हे गेल्या वर्षापासून मराठी सिनेमांसाठी मोठं दुखणं ठरत होतं. आकर्षक लोकेशन्स, बिग बजेट यांचा मराठी सिनेमांशी फार ...

Marathi films reach foreign countries | मराठी सिनेमा पोहचला परदेशी लोकेशन्सवर

मराठी सिनेमा पोहचला परदेशी लोकेशन्सवर

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">तुटपुंज बजेट हे गेल्या वर्षापासून मराठी सिनेमांसाठी मोठं दुखणं ठरत होतं. आकर्षक लोकेशन्स, बिग बजेट यांचा मराठी सिनेमांशी फार अभावानं संबंध दिसून यायचा.. मात्र आता काळ बदललाय आणि मराठी सिनेमांमध्ये दिसणारी लोकेशन्ससुद्धा बदललीत. कधी काळी ग्रामीण भागासह मुंबई आणि पुण्यात शूट होणारे मराठी सिनेमा आता परदेशातील आकर्षक लोकेशन्सवर शूट होऊ लागलेत. बजेट वाढल्याने मराठी सिनेमांमध्ये आता कधीही न पाहिलेली परदेशातली ठिकाणं दिसू लागलीत. 


 
 रितेश देशमुखच्या 'लय भारी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर लय भारी कमाल केली होती. या सिनेमातील काही दृष्यांचं चित्रीकरण दुबईमध्ये करण्यात आलं होतं. 
परदेशातील निळाशार सागरी किनारा मराठी सिनेमात पाहायला मिळाला तर ? ही कल्पनाच रसिकांसाठी सुखावणारी होती. मात्र कल्पना रसिकांसाठी प्रत्यक्षात अवतरली ती 'इश्कवाला लव्ह' या सिनेमातून. आदिनाथ कोठारे आणि सुलगना पाणीग्रही यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं शुटिंग मॉरिशसच्या नयनरम्य अशा सागरी किना-यावर करण्यात आलं होतं. 




सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळंही काही दिग्दर्शकांनी मराठी सिनेमाचं चित्रीकरण परदेशात करण्याचा निर्णय घेतला. 'यलो' या सिनेमातून महेश लिमये यांची दिग्दर्शक म्हणून कारकिर्द सुरु झाली.  या सिनेमात लिमये यांना एक अंडरवॉटर सीन चित्रीत करायचा होता. अंडरवॉटर सीनसाठी लागणारं तंत्रज्ञान आणि सुविधा भारतात नसल्यानं लिमये यांनी बँकॉकची वाट धरली. यलो सिनेमातील हा सीन बँकॉक विद्यापीठामध्ये चित्रीत करण्यात आला होता. 

बँकॉकमध्ये चित्रीत करण्यात आलेला आणखी एक मराठी सिनेमा म्हणजे 'बाबूरावला पकडा'. सिनेमाच्या कथानकाची गरज म्हणून या सिनेमाचं चित्रीकरण बँकॉकमध्ये करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सलमान खानच्या 'रेडी' सिनेमाचं चित्रीकरण ज्या बंगल्यात झालं त्याच बंगल्यात बाबूरावला पकडा या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी 'चिटर' हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला. या सिनेमातील काही दृष्यांचं चित्रीकरणसुद्धा मॉरिशसच्या सुंदर आणि नयनरम्य किना-यावर करण्यात आलं होतं. याशिवाय क्लासमेट्स, उलाढाल, 'मुक्काम पोस्ट लंडन' या सिनेमांच्या निर्मात्यांनाही परदेशी लोकेशन्सची भुरळ पडली. दर्जेदार कथा आणि आशयघन विषय यामुळं मराठी सिनेमा नव्या उंची गाठत होता. ग्रामीण भागातील लोकेशन्ससोबत आता परदेशातील आकर्षक आणि तितकंच प्रेमात पाडणा-या सुंदर अशा लोकेशन्सवर मराठी सिनेमांचं चित्रीकरण होऊ लागलंय. त्यामुळं मराठी सिनेमा रसिकांसाठी ही नक्कीच सुखावणारी गोष्ट म्हणावी लागेल.

Web Title: Marathi films reach foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.