मराठी चित्रपटाचा ‘सचिन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 17:17 IST2016-10-30T17:17:01+5:302016-10-30T17:17:01+5:30
बेनझीर जमादार मराठी चित्रपट सृष्टीत वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकर यांचे नाव आहे. निरोग, गंध, हॅपी ...

मराठी चित्रपटाचा ‘सचिन’
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> बेनझीर जमादार
मराठी चित्रपट सृष्टीत वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकर यांचे नाव आहे. निरोग, गंध, हॅपी जर्नी, राजवाडे अँड सन्ससारख्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख दर्शविली आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते म्हणूनही सचिन कुंडलकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अय्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘वजनदार’ हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. सचिन कुंडलकर यांनी ‘लोकमत सीएनएक्स’शी संवाद साधताना या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1. तुम्हाला वजनदार याच विषयावर चित्रपट का करावा वाटला?
- खरं सांगू का, मला सांगायला बिलकुल संकोच वाटत नाही. कारण मी लहानपणापासून ‘गोलूपोलू’ आहे. आपण जसजसे मोठे होतो, तशी लोक आपली चेष्टा करतात. पण काही काळानंतर काही लोकांमुळे व अनुभवामुळे आपल्याला आत्मसन्मान नावाची गोष्ट सापडते. यानंतर आपण स्वत:वर प्रेम करतो. हे अनुभव मला प्रकर्षाने मांडायचे होते. तेच मी हलक्याफुलक्या पद्धतीने वजनदार या चित्रपटातून मांडले आहे.
2. प्रिया व सईपेक्षा तुम्ही एका जाड अभिनेत्रीची निवड या चित्रपटासाठी का केली नाही?
- प्रियासोबत मी हॅपी जर्नीचा प्रवास केला होता. मला पुन्हा एकदा तिच्यासोबत प्रवास करायचे होते. आम्हाला दोघांनाही काहीतरी आव्हानात्मक करायचे होते. आज ते चॅलेंज या चित्रपटातून पूर्ण होत आहे. सईला मी बालक-पालक या चित्रपटात पाहिले होते. त्यावेळीच मी ठरवलं होतं की या चेहºयासाठी काहीतरी उत्तम लिहायचं आहे. आज ते स्वप्न पूर्ण होताना अधिक आनंद होतो आहे.
3. तुमच्या चित्रपटासाठी सई व प्रियाने वाढविलेले वजन एक दिग्दर्शक म्हणून तुमच्यासाठी जबाबदारीचे काम होते का?
- माझ्या चित्रपटासाठी मराठी इंडस्ट्रीच्या या दोन टॉपच्या अभिनेत्रींनी वजन वाढव़णं हे दिग्दर्शक म्हणून खूप मोठे जबाबदारीचे व जोखमीचे काम होते. कारण माझ्या विश्वासावर फक्त सई व प्रियाने आपल्या शरीराशी खेळ केला आहे. आजच्या काळात हे असं काम कोण करणार? त्यामुळे त्यांचा हा विश्वास नक्कीच सार्थक ठरेल अशी अपेक्षा आहे.
4. तुम्ही पहिल्यांदा कॉमेडी अँगलने चित्रपट करत आहात याविषयी काय सांगाल?
- मी पहिल्यांदा असं ठरवलं की काहीतरी वेगळं काम करून पाहावं. ते काम पण आव्हानात्मक असले पाहिजे असे माझे मत होते. म्हणून मी कॉमेडी चित्रपट करावा असे ठरविले. तसेच वजनदार या चित्रपटाने ही संधी चालून आली. पण या चित्रपटातील विनोद हा कोणाचा अपमान करणारा नाही, तर माणसाची बाजू घेणारा हा आहे.
5. स्त्रीप्रधान चित्रपट बनविण्याकडे तुमचा कल असतो का?
- स्त्री हे माध्यम नेमकी भूमिका सांगणारे असते. कारण त्यानिमित्ताने तुम्ही कुटुंबाची गोष्ट सांगता. मला कुटुंबावर आधारित असणारे चित्रपट बनवायला आवडतात. कारण तो चित्रपट प्रेक्षकांना आपला वाटतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनी आता चित्रपट हे स्त्री व पुरूषप्रधान आहे का? या चष्म्यातून पाहणे सोडून दिले पाहिजे. चित्रपट हा सर्व प्रेक्षकांसाठी असतो. येथे कोणताही स्त्री व पुरूष असा भेद केला जात नाही.
![]()