स्वीडनमध्ये रंगणार मराठी सिनेमांची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 17:29 IST2017-04-08T11:59:15+5:302017-04-08T17:29:15+5:30

स्वीडन फिल्म असोसिएशन आणि विनसन वर्ल्ड हे गोवा इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच मराठी इंटरनॅशनल फिल्म ...

Marathi film festival to be played in Sweden | स्वीडनमध्ये रंगणार मराठी सिनेमांची मेजवानी

स्वीडनमध्ये रंगणार मराठी सिनेमांची मेजवानी

वीडन फिल्म असोसिएशन आणि विनसन वर्ल्ड हे गोवा इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच मराठी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं स्टॉकहोम स्वीडन येथे 20 ते 24 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.त्यामुळे मराठी सिनेमाला आणखी एक मोठ इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळणार आहे.या फिल्म फेस्टिवलची सुरुवात ​​अनंत महादेवन​ यांच्या​ ​डॉ रखमाबाई​ ​ ​या सिनेमाने होणार असून त्यानंतर ​ हरिश्चंद्राची फॅक्टरी​ ,​​अस्तु,  ​​एक हजाराची नोट, फँड्री, एक अलबेला, वजनदार, मी सिंधूताई सपकाळ, नटी खेळ, नटसम्राट, हाफ तिकीट, कट्यार काळजात घुसली, कासव, डॉ. प्रकाश बाबा आमटे, मला आई व्हायचंय, संहिता, रमा माधव, द सायलेन्स आणि एलिझाबेथ एकादशी हे सिनेमे दाखवले जाणार आहेत.डॉ. रखमाबाई या सिनेमाचा प्रीमिअर इथे होणार असून या सिनेमाला महाराष्ट्र राज्याचा बेस्ट साउंड, कास्टिंग आणि आर्ट डिरेक्शनला पुरस्कार मिळाले आहेत. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट डिरेक्शन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता यासाठी नामांकन मिळाले होते.या फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिने इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असून स्वीडनमधील प्रेक्षकांना या कलाकारांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.​SIFA ही नॉन प्रॉफिट संस्था 2004 मध्ये कुंनी टॉपडेन आणि क्रिस्टर होलग्रेन यांनी सुरू केली. या संस्थेचे आधारस्तंभ असलेले कुंनी हे गेली अनेक वर्ष दोन देशांमधील कला क्षेत्रातील, दोन देशातील सिने इंडस्ट्रीतील अंतर कमी करण्यासाठी काम करत आहेत.

यावेळी कुंनी टॉपडेन म्हणाल्या की,  माझी भेट संजय शेट्ये यांच्याशी गोवा फिल्म फेस्टीव्हलच्या निमित्ताने झाली. आणि मी मराठीतील अर्थपूर्ण सिनेमा पाहून खूप प्रेरित झाले.  खासकरून गजेंद्र अहिरे यांचे सिनेमे आणि समृद्धी पोरे यांच्या मला आई व्हायचंय या सिनेमाने. त्यानंतर मी संजय शेट्ये यांच्यासोबत मिळून आम्ही मराठी सिनेमा प्रमोट करण्याच्या उद्देशाने स्वीडन फिल्म फेस्टीवलची संकल्पना समोर आणली.​SIFA ही संस्था विनसन वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने स्वीडिश प्रेक्षकांसाठी दर्जेदार सिनेमे घेऊन येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या सिनेमासाठी मार्केट तयार करणे आणि दोन्ही देशांमध्ये मराठी सिनेमांच्या सहनिर्मितीला प्रोत्साहन देणे हे आमचं टार्गेट आहे.​या फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण 20 सिनेमे स्टॉकहोम येथे दाखवले जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.यासोबतच त्यांनी सांगितले की, त्या त्यांची कंपनी गजेंद्र अहिरे यांच्यासोबत एक शॉर्ट प्रायोगिक मराठी सिनेमाही करणार आहे.विनसन वर्ल्डला या क्षेत्रात तब्बल 20 वर्षांपासून काम करत असून त्यांच्या गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. या फेस्टिवलमध्ये सिने रसिकांना फिल्म प्रीमिअर, वेगवेगळ्या दर्जेदार सिनेमांची निवड, कलाकारांना मानवंदना देणे, संवाद कार्यक्रम, नाटकांचे सादरीकरण आणि रेड कार्पेट अनुभवामुळे हा फेस्टिवल नेहमीच गाजतो.

याबद्दल संजय शेट्ये म्हणाले की, मला आनंद होतो की, 9 वर्षांआधी आम्ही गोव्यात सुरू केलेली गोवा फिल्म फेस्टिवलची संकल्पना आता आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. आम्हाला याचाही आनंद होत आहे की SIFA सोबत आम्ही दर्जेदार मराठी सिनेमे स्वीडनला घेऊन जात आहोत. आम्हाला आशा आहे की स्वीडिश प्रेक्षकांसाठी ही चांगली मेजवानी ठरेल.कासव या सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. हा सिनेमा स्वीडन फिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही दाखवत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतोय.यावेळी गजेंद्र अहिरे म्हणाले की, गोवा मराठी फिल्म फेस्टिवल माझ्यासाठी नेहमीच स्पेशल राहिला आहे. यासोबतच माझी सिनेमा बनवण्याची कला परदेशातील लोकांचे लक्ष वेधत आहे.  दुसऱ्या देशांच्या लोकांसोबतही मला काम करण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. स्वीडन मराठी फिल्म फेस्टिवलसोबत जोडल्या गेल्याचा मला आनंद होत आहे. त्यासोबत या कंपनीसोबत एक शॉर्ट प्रायोगिक मराठी फिल्म करण्याची संधी मिळाली. "Yours Only" असं या फिल्मचं नाव असल्याचही त्यांनी यावेळी जाहीर केलं.तर अनंत महादेवन यावेळी बोलताना म्हणाले की, मी निर्मात्या स्वप्ना पाटकर यांचे आभार मानतो की त्यांनी  रखमाबाई सारख्या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. त्यासोबतच आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की आमचा सिनेमा स्वीडन मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्यांदा दाखवला जातोय. यासोबतच मी सिनेमाच्या लेखिका मोहिनीजी, कलाकार आणि क्रू चे आभार मानतो.यावेळी नागेश भोसले, तनिषा चॅटर्जी, स्वप्ना पाटकर, संजय राऊत,  नानिक जयसिंघानिया, समित कक्कड, समृद्धी पोरे, भरत दाभोलकर, ​​अनंत महादेवन, गजेंद्र अहिरे, विश्वास जोशी, मृणाल कुलकर्णी, शेखर सारतांडेल, सुनील सुखथनकर, मोहन आगाशे, मोनिश बबरे, सुहास, विधी कासलीवाल आणि सुनील फडतरे  हे उपस्थित होते.

Web Title: Marathi film festival to be played in Sweden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.