​बोमन इराणी झळकणार या मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 11:23 IST2016-10-25T11:22:23+5:302016-10-25T11:23:51+5:30

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे बोमन इराणीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर बोमनला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आणि तो बॉलिवूडमध्ये स्थिरावला. त्याने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत आणि आता तो मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री करणार आहे.

In the Marathi film of Boman Irani | ​बोमन इराणी झळकणार या मराठी चित्रपटात

​बोमन इराणी झळकणार या मराठी चित्रपटात

न्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे बोमन इराणीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर बोमनला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आणि तो बॉलिवूडमध्ये स्थिरावला. त्याने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत आणि आता तो मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री करणार आहे. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोमनचा मित्र राजेश मापुसरकचे असल्याने त्याने या चित्रपटासाठी होकार दिला. फेरारी की सवारी या राजेशने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटातही बोमन प्रमुख भूमिकेत झळकला होता.  
व्हेंटिलेटर या चित्रपटात आशुतोष गोवारिकर, जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी-मोने, उषा नाडकर्णी, निलेश दिवेकर यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्याने ही बातमी स्वतःच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरून दिली आहे. त्याने एक ट्वीट करून त्यात म्हटले आहे की, "माझा मित्र राजेश मापुसकरच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करायला मला खूप आनंद होत आहे." त्याने ट्वीटमध्ये त्याच्या भूमिकेविषयी काहीही म्हटले नसले तरी हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसणार आहे. कारण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना बोमन इराणी पाहायला मिळत आहे. एका कुटुंबियातील एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येते अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात बोमन एका डॉक्टरची भूमिका साकारत असून तो अस्खलित मराठी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 


 

Web Title: In the Marathi film of Boman Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.