मराठीचं श्रियाला वावडं नाही, मराठी सिनेमात काम करण्यायाची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 21:00 IST2019-01-25T21:00:00+5:302019-01-25T21:00:00+5:30

श्रियाचा कल जास्त बॉलीवुडकडे आहे का असं बोललं जात आहे. मात्र आपल्यासाठी सिनेमा हा सिनेमाच असून त्यासाठी भाषेची मर्यादा किंवा बंधनं नसल्याचे तिनं स्पष्ट केले आहे.

Marathi does not want to be a part of Marathi, desire to work in Marathi cinema | मराठीचं श्रियाला वावडं नाही, मराठी सिनेमात काम करण्यायाची इच्छा

मराठीचं श्रियाला वावडं नाही, मराठी सिनेमात काम करण्यायाची इच्छा

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर. मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयासह दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य यातही सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सचिन यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रिया पिळगावकरसुद्धा अभिनयात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. 

आपल्या आईवडिलांनी स्वतःच्या मेहनतीवर रसिकांचं प्रेम मिळवलं आहे हे श्रिया नेहमी अभिमानाने सांगते. आईवडिलांचं किंवा कुणाचंही स्टारडम पछाडत पुढे जाणं हे आपलं ध्येय नसल्याचंही ती सांगते. याउलट स्वतःची ओळख आणि अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी मेहनत करण्याची तिची तयारी आहे. २०१९ची सुरुवात श्रियासाठी दणक्यात झाली आहे. राणा डग्गुबात्तीसह ती दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करणार आहे. हाथी मेरे साथी या सिनेमातून ती एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष अशी या सिनेमाची कथा असून हा विषय श्रियासाठी अगदी जवळचा आहे. याशिवाय ती मुल्क सिनेमाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या अभी तो पार्टी शुरू हुई है या सिनेमातही काम करणार आहे. 

यामुळे श्रियाचा कल जास्त बॉलीवुडकडे आहे का  असं बोललं जात आहे. मात्र आपल्यासाठी सिनेमा हा सिनेमाच असून त्यासाठी भाषेची मर्यादा किंवा बंधनं नसल्याचे तिनं स्पष्ट केले आहे. कोणतीही भाषा किंवा जॉनरमध्ये अडकायचे नसल्याचे सांगितले आहे. हिंदी सिनेमा आणि  वेबसिरीज यांत नाव कमावणारी श्रिया मराठीत कधी परतणार याची रसिकांना उत्सुकता आहे. मराठीत सिनेमात श्रियाला काम करायचं नाही असा काही जणांचा गैरसमज झाला असल्याचे तिला वाटतं. उलट मराठी सिनेमा आपल्या मनाशी आणि काळजाच्या अगदी जवळ असल्याचं ती म्हणते. एकुलती एक सिनेमातून करिअरची सुरूवात केली आणि चित्रपटसृष्टीत दिवसेंदिवस प्रगती करतेय असं तिने म्हटले आहे. अद्याप कोणताही मराठी सिनेमा साईन केला नसून २०१९ साली भरपूर मराठी सिनेमात काम करू असं तिने आवर्जून सांगितलं. तूर्तास हाती असलेल्या प्रोजेक्टलर लक्ष केंद्रीत केल्याचे तिने म्हटले आहे.  

Web Title: Marathi does not want to be a part of Marathi, desire to work in Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.