Marathi Cinema: मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्यांनी चिमुकल्यांसमवेत साजरा केला बालदिन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 09:26 PM2021-11-14T21:26:27+5:302021-11-14T21:27:29+5:30

Marathi Cinema: एरव्ही शूटिंग मध्ये व्यस्त असलेले सुप्रसिद्ध अभिनेते Vijay Patkar यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत लहान मुलांसमवेत बालदिन साजरा केला. त्यांना पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला.

Marathi Cinema: Actors from the Marathi film industry celebrated Children's Day with Chimukalya | Marathi Cinema: मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्यांनी चिमुकल्यांसमवेत साजरा केला बालदिन

Marathi Cinema: मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्यांनी चिमुकल्यांसमवेत साजरा केला बालदिन

googlenewsNext

 मुंबई- एरव्ही शूटिंग मध्ये व्यस्त असलेले सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत लहान मुलांसमवेत बालदिन साजरा केला.  त्यांना पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. बालदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पार्थ फाऊंडेशनच्या वतीने शिवाजीपार्क येथील माई मंगेशकर उद्यानात बालदिन साजरा करण्यात आला.

यावेळी अभिनेते विजय पाटकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार व पार्थ फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते मुलांना गुलाबाचे फुल, चॉकलेट आणि वही पेन्सिल अशी भेटवस्तू देण्यात आली. यावेळी मुलांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आग्रह धरला.

कोरोना काळानंतर दीड वर्षांनी मी मुलांमध्ये सामील झालो मला माझे बालपण आठवले त्यावेळेस आम्ही भरपूर खेळायचो अशी आठवण पाटकर यांनी सांगितली. तर बालदीनाचे औचित्य साधत दरवर्षी मुलांना भेटवस्तू देण्यात येते त्यानिमित्ताने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरते ते एकत्र येत मौज मजा करतात त्यातच समाधान वाटते अशी प्रतिक्रिया किल्लेदार यांनी दिली.

Web Title: Marathi Cinema: Actors from the Marathi film industry celebrated Children's Day with Chimukalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.