मराठी कलाकारांची दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 12:49 IST2016-10-29T19:06:22+5:302016-11-29T12:49:53+5:30
सेलिब्रेटीदेखील आपल्या कामाच्या वेळा सांभाळून दिवाळी हा सण जल्लोषात साजरा करत असतात. दिवाळीत कमी आवाजाचे फटाके फोडा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी ...
.jpg)
मराठी कलाकारांची दिवाळी
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> सेलिब्रेटीदेखील आपल्या कामाच्या वेळा सांभाळून दिवाळी हा सण जल्लोषात साजरा करत असतात. दिवाळीत कमी आवाजाचे फटाके फोडा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असे सांगते आहेत हे सेलिब्रेटी...
नवीन घरातील पहिलीच दिवाळी - सुयश टिळक
नवीन घरातील पहिलीच दिवाळी - सुयश टिळक
मी बऱ्याच वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतो. मला दिवाळीत फटाके फोडून प्रदूषण करायला अजिबात आवडत नाही. यावेळी मी माझ्या कुटुंबासोबतच वेळ घालवतो. नेहमी कामाच्या धावपळीमुळे फॅमिलीली वेळ देता येत नाही. मग दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना छान भेटता येते. यंदाची दिवाळी माझ्यासाठी जास्त खास आहे, कारण मुंबईतील माझ्या नवीन घरातील ही पहिलीच दिवाळी आहे. दिवाळी आली की घरात खमंग फराळाचा सुगंध घरभर दरवळू लागतो. तसेच मी दरवर्षी दिवाळीमध्ये घरी किल्ला करतो. दिवाळीत मस्त शॉपिंगही करता येते. त्यामुळे मला दिवाळी हा सण जास्त आवडतो. मी सर्वांनाच सांगेन की, दिवाळीला फटाके फोडू नका ही दिवाळी प्रदुषणमुक्त साजरी करा.
![]()
.
पारंपरिक पद्धतीने साजरी करते दिवाळी - पूजा सावंत
मी अतिशय पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करते. मी दरवर्षीच दिवाळीला सकाळी उठून अभ्यंग स्नान करते. घरात छान मंगलमय वातावरण यावेळी असते. आमच्या घरी सर्वजण एकत्र जमतात आणि मजा-मस्ती करतात. मला दिवाळीत पणत्याची सुंदर सजावट करायला खूप आवडते. यंदा मी आणि माझ्या बहिणीने दिवाळीच्या निमित्ताने रस्त्यांवरील प्राण्यांना आणि एका प्राण्यांच्या संस्थेला खाद्य देण्याचे ठरवले आहे. दिवाळीच्या दरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे प्राणी प्रचंड घाबरतात. त्यामुळे ही दिवाळी ध्वनी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचे मी सगळ्यांना आवाहन करेन.
![]()
नवऱ्यासोबत दिवाळीची धमाल - प्रिया मराठे
मी दिवाळीला घरीच आकाश कंदील तयार केले आहेत. घरात रांगोळी काढणे, पणत्यांची सजावट करणे, फराळ करणे या सर्वच गोष्टी मला फार आवडतात. तसेच ही दिवाळी माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण या वर्षी मी माझ्या नवऱ्यासोबत एकदम स्पेशल दिवाळी साजरी करते आहे. सोशल मीडियावर मी आणि माझ्या नवऱ्याने एक दिवाळीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये तुम्हाला आम्ही वेगळ्याच पद्धतीने शुभेच्छा देताना पाहायला मिळणार आहे. टीपिकल काहीतरी करण्यापेक्षा नाविण्यपूर्ण दिवाळी साजरी करण्याचे आम्ही ठरवले आहे. तसेच दिवाळीदरम्यान होणारे प्रदूषण टाळण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.