चॅलेंज! या क्यूट चिमुरडीला ओळखलंत? आज आहे मराठीची दिग्गज अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 08:00 AM2022-08-04T08:00:00+5:302022-08-04T08:00:02+5:30

Marathi Actress Childhood Photo : इंटरनेटवर रोज नव्या सेलिब्रिटीच्या बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. हा फोटो आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा...

Marathi Actress Tejaswini Pandit childhood picture viral on social media | चॅलेंज! या क्यूट चिमुरडीला ओळखलंत? आज आहे मराठीची दिग्गज अभिनेत्री

चॅलेंज! या क्यूट चिमुरडीला ओळखलंत? आज आहे मराठीची दिग्गज अभिनेत्री

googlenewsNext

Marathi Actress Childhood Photo : सेलिब्रिटींचं सोशल अकाऊंट म्हणजे जणू खजिनाच. सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना काय काय नाही मिळतं? आपल्या आवडत्या स्टारच्या दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडी, जुन्या आठवणी, बालपणीचे फोटो, त्यांच्या कुंटुंबियांचे फोटो, हॉलिडेज मेमरी अशा चिक्कार गोष्टी यावर मिळतात. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो ही तर चाहत्यांची आवडती गोष्ट. म्हणूनच इंटरनेटवर रोज नव्या सेलिब्रिटीच्या बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. हा फोटो आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा.

या मराठीतल्या बिनधास्त अभिनेत्रींने कधीकाळी तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. सध्या हाच फोटो व्हायरल होतोय. या फोटोत असलेली ही चिमुकली आता खूपच वेगळी दिसते. केवळ तिच्या डोळ्यांवरून ही अभिनेत्री कोण आहे याचा अंदाज येऊ शकेल. अर्थात अद्यापही फोटोतील या चिमुकलीला तुम्ही ओळखू शकले नसाल तर आम्ही सांगतो.


 
या फोटोतील ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit) आहे.  या फोटोत ती खूपच गोड दिसत असल्याचे तिच्या फॅन्सने तिला कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे. पिवळ्या रंगाचा फ्रॉक, लाल तपकरी केस आणि चेहºयावरचे मिश्किल भाव असलेला हा फोटो तेजस्विनी पंडितचा आहे. 

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे फिल्मी करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं चांगलं च कौतुक झालं होतं.

 गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं. तिचा ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या   सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाºया तेजस्विनीची आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. 

Web Title: Marathi Actress Tejaswini Pandit childhood picture viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.