'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 05:42 PM2024-06-15T17:42:40+5:302024-06-15T17:45:29+5:30

लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने यांना 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. सुकन्या मोनेंनी पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्यावर डान्स केला आहे.

marathi actress sukanya mone dance on angaro sa pushpa 2 movie song watch video | 'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच

'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गाणं प्रदर्शित होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 

काही मराठी सेलिब्रिटींनाही अंगारो सा गाण्याची भुरळ पडली. अनेक सेलिब्रिटींचे या गाण्यावरील व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने यांना अंगारो सा गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. सुकन्या मोनेंनी पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत सुकन्या मोने गुलाबी रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहेत. अंगारो सा गाण्याच्या हुक स्टेपही त्यांनी केल्या आहेत. सुकन्या मोने यांच्याबरोबर अभिनेत्री मधुरा जोशीही या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. 

'अंगारो सा' आणि  'एक लाजरान साजरा मुखडा' या फ्युजन गाण्यावरील सुकन्या मोनेंचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

२०२१ साली 'पुष्पा' हा दाक्षिणात्य सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. पुष्पाची स्टाइल आणि त्याचे डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  आता या सिनेमाचा स्वीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ ऑगस्टला 'पुष्पा २' प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: marathi actress sukanya mone dance on angaro sa pushpa 2 movie song watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.