काही दिवसांपूर्वी काम मागणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं सुरू केला नवा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:35 PM2021-07-19T19:35:24+5:302021-07-19T19:36:00+5:30

माझ्याकडे काम नाहीये, मला चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा कुठल्याही माध्यमातून काम करण्याची इच्छा आहे, अशी पोस्ट या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली होती.

this Marathi actress started a new business | काही दिवसांपूर्वी काम मागणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं सुरू केला नवा बिझनेस

काही दिवसांपूर्वी काम मागणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं सुरू केला नवा बिझनेस

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने काही दिवसांपूर्वी काम मिळावे या हेतूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माझ्याकडे काम नाही आहे, असे सांगितले होते. मात्र तिच्या या पोस्टची दखल कुणी घेतली असे वाटत नाही. मात्र आता या  अभिनेत्रीने स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. 

बालक पालक या चित्रपटातून शाश्वती घराघरात पोहचली. सिंधू या मालिकेतील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. परी, चाहूल या मालिका तसेच हेडलाईन अशा काही प्रोजेक्टमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

मागील वर्षी १७ डिसेंबर २०२० रोजी शाश्वतीने फोटोग्राफर आणि इंटेरिअर डिझायनर असलेल्या राजेंद्र करमकर सोबत लग्न केले. लग्नानंतर ती पती राजेंद्र करमरकरसोबत कोथरूड येथे स्थायिक झाली आहे.


काही दिवसांपूर्वी शाश्वती पिंपळीकर हिने ‘माझ्याकडे काम नाहीये मला चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा कुठल्याही माध्यमातून काम करण्याची इच्छा आहे अशी पोस्ट शेअर केली होती.  

मात्र तिच्या या पोस्टची तितकीशी दखल घेतली नसल्याचे दिसून येते. कारण शाश्वती आता अभिनय सोडून वेगळ्याच क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहत आहे. “मुदपाकखाना” या नावाने ती खाद्य पदार्थांचा एक नवा बिजनेस सुरू करत आहे.
कोथरूड परिसरात पार्टी ऑर्डर असो किंवा एखादे घरगुती फंक्शन त्यासाठी तुम्ही शाश्वतीच्या मुदपाकखान्यातून जेवणाची ऑर्डर करू शकता.

महाराष्ट्रीयन, पंजाबी तसेच ग्राहकांच्या ऑर्डर नुसार तुम्ही विविध पदार्थ देखील इथून मागवू शकता असे शाश्वतीने सांगितले आहे. पार्टी ऑर्डर सोबतच येत्या ३१ जुलै पासून दर शनिवार आणि रविवारी एक फिक्स मेन्यू ठेवण्यात येईल असे शाश्वतीने सांगितले. या कामात तिला तिच्या नवऱ्याची देखील खूप मोठी साथ मिळाली आहे. 

Web Title: this Marathi actress started a new business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.