सोनाली कुलकर्णीचे 'अहो' काय काम करतात माहितीये का? खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:27 PM2024-02-24T18:27:41+5:302024-02-24T18:29:15+5:30

सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईत काय काम करतो?

marathi actress Sonalee Kulkarni reveals her husband Kunal Bonedekar s profession in dubai | सोनाली कुलकर्णीचे 'अहो' काय काम करतात माहितीये का? खुलासा करत म्हणाली...

सोनाली कुलकर्णीचे 'अहो' काय काम करतात माहितीये का? खुलासा करत म्हणाली...

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) नुकतंच साऊथ सिनेमातही पदार्पण केलं. 'मलाईकोट्टई वालिबन' सिनेमात तिला मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सोनाली आता मराठीशिवाय हिंदी, साऊथ इंडस्ट्रीतही ओळखली जाऊ लागली आहे. सोनालीचं प्रोफेशनल आयुष्य तर उत्तम सुरुच आहे तसंच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा असते. सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईत असतो. त्यामुळे सोनाली कधी भारतात तर कधी दुबईत असते. नुकतंच तिने कुणाल दुबईत नक्की काय काम करतो याचा खुलासा केला आहे.

सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, "कुणाल एका एजन्सीत लॉस अॅडजस्टर आहे. म्हणजेच तो कंपन्यांचा तोटा शोधून काढतो. बँक किंवा कंपन्यांचा तोटा नेमका कुठे झाला, किती झाला हे तो तपासतो. जेव्हा बँकेत फ्रॉड होतो तेव्हा ते इन्शुरन्स कंपनीकडे जातात. मग इन्शुरन्स कंपनी यांच्या एजन्सीला तोटा शोधायचं काम देते."

नवऱ्याचं कौतुक करत सोनाली म्हणाली, "तो खूपच हुशार आहे. आपल्याला त्याचं काम ऐकून फार फॅन्सी वाटतं. तो दुबईला राहत असला तरी मूळचा यूकेचा आहे. त्याला माझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी मराठीतली एक अभिनेत्री आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. आजही तो माझ्या क्षेत्रापासून दूरच असतो. त्याला फिल्म इंडस्ट्रीशी काहीच देणं घेणं नाही. पण मी जे करते त्यात तो मला कायम पाठिंबा देत असतो. बाकी इथे काय चाललंय, कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे तो लक्ष देत नाही."

सोनाली कुलकर्णी कोव्हिड काळात लग्नबंधनात अडकली. त्यानंतर एक वर्षाने दोघांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले. सोनालीने अरेंज मॅरेज करत सर्वांना सरप्राईजच दिले होते. 

Web Title: marathi actress Sonalee Kulkarni reveals her husband Kunal Bonedekar s profession in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.