मीरा जोशी करणार रसिकांना घायाळ, जाणून घ्या यामागचे खास कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 08:00 AM2019-01-27T08:00:00+5:302019-01-27T08:00:00+5:30

वैशाली सामंत यांच्या आवाजात हे उडत्या चालीचे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Marathi Actress Meera Joshi New Premvari Marathi Movie | मीरा जोशी करणार रसिकांना घायाळ, जाणून घ्या यामागचे खास कारण

मीरा जोशी करणार रसिकांना घायाळ, जाणून घ्या यामागचे खास कारण

googlenewsNext

प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या 'प्रेमवारी' या चित्रपटातील 'तू ऑनलाईन ये ना' हे आयटम साँग नुकतेच प्रदर्शित झाले. रसिकप्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले असून या गाण्यात तिची एन्ट्री जेसीबी मधून होताना दिसतेय. या जल्लोषमय गाण्याचे चित्रीकरण कोपरगावनजीक वारी या गावात झाले आहे. दोन रात्रींमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या उत्स्फूर्त गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांचे असून, अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर वैशाली सामंत यांच्या आवाजात हे उडत्या चालीचे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
 
प्रेम म्हणजे त्याग, समर्पण प्रेमाचे एक अनोखे रूप या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून,प्रस्तुतीही त्यांचीच आहे. प्रेमाचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

काही दिवसांपूर्वीच  या चित्रपटातले 'पूजाच्या हळदीला' हे तर्राट साँग रिलीज झाले होते. लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमातील हे गाणं एक पार्टी साँग आहे. भारत गणेशपुरे आणि अभिजित चव्हाण या गाण्यात नाचताना दिसत आहेत. या गाण्याचे चित्रीकरण शिर्डी जवळच्या वारी गावात, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेंद्र गायकवाड यांच्या घरी करण्यात आले आहे. हे गाणं चित्रित करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये लग्नघर दिसावे म्हणून अनेक बदल करण्यात आले होते. 

Web Title: Marathi Actress Meera Joshi New Premvari Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.