Isha Keskar : तू बेस्ट आहेस..., बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकर, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:16 PM2023-03-03T12:16:05+5:302023-03-03T12:16:24+5:30

Isha Keskar : ईशा सोशल मीडियावर ही चांगली सक्रिय असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या एका रोमॅन्टिक व्हिडीओची.

Marathi Actress Isha Keskar Birthday post for Boyfriend Rishi Sexsena Romantic Dance Video | Isha Keskar : तू बेस्ट आहेस..., बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकर, पाहा Video

Isha Keskar : तू बेस्ट आहेस..., बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकर, पाहा Video

googlenewsNext

झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या गाजलेल्या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर (Isha Keskar). 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये शनायाची मॉर्डन भूमिका तिने तितक्याच लिलया पेलली होती. काही दिवसांपूर्वीच ईशाचा ‘सरला एक कोटी’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. ईशा सोशल मीडियावर ही चांगली सक्रिय असते. ती नेहमीच तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करताना दिसते. सध्या चर्चा आहे ती तिच्या एका रोमॅन्टिक व्हिडीओची.

होय, ईशा केसकर 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता ऋषी सक्सेनासोबत (Rishi Sexsena) रिलेशनशिपमध्ये आहे. आज ऋषीचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवशी ईशाने खास व्हिडीओ शेअर करत, आपल्या बाॅयफ्रेन्ड बर्थ डे विश केलं आहे. व्हिडीओ चांगलाच रोमॅन्टिक आहे. व्हिडीओ दोघंही लव्हबर्ड्स रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.  “ऋषी सक्सेना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू खरंच बेस्ट आहेस. लव्ह यू...”, असं तिने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

ईशा व ऋषी दोघे पहिल्यांदा  'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर भेटले होते. या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना या कार्यक्रमात पाहिलं. ईशाने ऋषीला पाहिल्यावर तो खूप शांत असल्याचं तिला जाणवलं. त्यावेळी ऋषीच्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं. अर्थात तेव्हा त्यांच्यात काहीच बोलणं झाल नव्हतं. पुढे कॉफीसाठीच्या भेटीगाठी वगैरे सुरु झाल्या. इशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. या भेटीतच त्याचा निरागसपणा तिचं मन जिंकून गेलं. 

ऋषीबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा जन्म मुंबईतच झाला आहे.  सुरुवातीच्या काळात ऋषीने मॉडेलिंग केलं. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. त्याची पहिलीच मालिका काहे दिया परदेस ही खूपच गाजली होती. या मालिकेत त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत होती.  या मालिकेनंतर ऋषी वेबसिरिजकडे वळला. त्याची प्रेम, रोमान्स आणि कॉमेडीवर आधारित असलेली वेबसिरीज गुडबॉय हंगामा, एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं. आगामी काळात तो अनेक प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  

Web Title: Marathi Actress Isha Keskar Birthday post for Boyfriend Rishi Sexsena Romantic Dance Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.