"माझं तुझ्यावर प्रेम आहे...", चाहत्याने हृता दुर्गुळेला सगळ्यांसमोरच केलं प्रपोज, हातावर काढलाय अभिनेत्रीचा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:19 IST2025-09-18T13:17:56+5:302025-09-18T13:19:12+5:30

चाहत्याने हृताला सगळ्यांसमोरच प्रपोज केलं. अभिनेत्रीकडून त्या चाहत्याने ऑटोग्राफ घेतला. या ऑटोग्राफचा टॅटू या चाहत्याने त्याच्या हातावर काढला आहे.

marathi actress hruta durgule fan made actress autograph tattoo on hand video | "माझं तुझ्यावर प्रेम आहे...", चाहत्याने हृता दुर्गुळेला सगळ्यांसमोरच केलं प्रपोज, हातावर काढलाय अभिनेत्रीचा टॅटू

"माझं तुझ्यावर प्रेम आहे...", चाहत्याने हृता दुर्गुळेला सगळ्यांसमोरच केलं प्रपोज, हातावर काढलाय अभिनेत्रीचा टॅटू

महाराष्ट्राची क्रश अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'फुलपाखरू' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली हृता त्यानंतर मालिका, वेब सीरिज आणि सिनेमांमधूनही विविधांगी भूमिका साकारताना दिसली. आता हृता 'आरपार' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान हृताला एक जबरा फॅन भेटला. 

या चाहत्याने हृताला सगळ्यांसमोरच प्रपोज केलं. अभिनेत्रीकडून त्या चाहत्याने ऑटोग्राफ घेतला. या ऑटोग्राफचा टॅटू या चाहत्याने त्याच्या हातावर काढला आहे. व्हिडीओत तो म्हणतो, "मी पुन्हा एकदा सांगतो मी मॅमचा खूप मोठा फॅन आहे. मॅम तुमचे स्क्रीनवर दिसणारे आत्तापर्यंत १० प्रोजेक्ट झालेले आहेत. ३ मालिका, २ वेब सीरिज आणि ५ चित्रपट आणि तुम्ही कालच पोस्ट टाकलीये की तुमचं ११वं प्रोजेक्ट येतंय. माझ्या शरीरावर १० टॅटू आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही मला तुमचा ऑटोग्राफ द्या. तो ऑटोग्राफ मी माझा ११ वा टॅटू म्हणून काढेन. तुमचा ११वा प्रोजेक्ट माझा ११वा प्रोजेक्ट... मॅम माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे". 


हृताचा 'आरपार' सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. एक अनोखी लव्हस्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात हृतासोबत अभिनेता ललित प्रभाकरही मुख्य भूमिकेत आहे. 'आरपार' या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: marathi actress hruta durgule fan made actress autograph tattoo on hand video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.