मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत!, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 04:15 PM2021-12-24T16:15:40+5:302021-12-24T16:16:46+5:30

रसिका सुनील(Rasika Sunil) नंतर आता मराठमोळा हा अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे.

marathi actor Suyog Gorhe just married!, the video is going viral | मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत!, व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत!, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. हा अभिनेता म्हणजे सुयोग गोऱ्हे. नुकतेच सुयोग गोऱ्हे (Suyog Gorhe) नेहा शिंदेसोबत विवाह बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्न सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अभिनेता सुयोग गोऱ्हे नुकताच नेहा शिंदेसोबत नाशिकमध्ये लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याचे लग्नाची सर्व माहिती गुपित ठेवली होती. मात्र सोशल मीडियावर त्याच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात तो वराच्या गेटअपमध्ये दिसतो आहे आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी नेहादेखील दिसते आहे. 


सुयोग गोऱ्हे मुळचा नाशिकचा आहे.  तो अभिनेत्याशिवाय होमियोपॅथी फिजिशियन आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने सिद्धार्थ चांदेकरच्या एका चित्रपटासाठी स्पॉटबॉयचे काम केले होते. कालांतराने त्याच्याचबरोबर बसस्टॉप या चित्रपटासाठी मी स्क्रीन शअर केली.  ​त्याने २०१७ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बसस्टॉप चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली.या चित्रपटात  सुयोग  व्यतिरिक्त अमृता खानविलकर, पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. शेंटीमेंटल, अनान, कृतांत, आम्ही बेफिकिर, गर्लफ्रेंड, साताऱ्याचा सलमान आणि सिनिअर सिटीझन या चित्रपटात त्याने काम केले आहे.

Web Title: marathi actor Suyog Gorhe just married!, the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.