Prasad Oak : “सरकारनी ठरवलं तर टॅक्स...“; प्रसाद ओकची ती पोस्ट होतेय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:49 AM2023-03-26T10:49:46+5:302023-03-26T10:52:09+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) सोशल मीडियावर किती ॲक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. रोज नवे भन्नाट रील्स, व्हिडीओ, फोटो असं सगळं तो शेअर करत असतो.

marathi actor prasad oak shared reel with wife manjiri about income tax | Prasad Oak : “सरकारनी ठरवलं तर टॅक्स...“; प्रसाद ओकची ती पोस्ट होतेय तुफान व्हायरल

Prasad Oak : “सरकारनी ठरवलं तर टॅक्स...“; प्रसाद ओकची ती पोस्ट होतेय तुफान व्हायरल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) सोशल मीडियावर किती ॲक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. रोज नवे भन्नाट रील्स, व्हिडीओ, फोटो असं सगळं तो शेअर करत असतो. सध्या त्याचं असंच एक भन्नाट रील व्हायरल होतंय.
गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर एका जुन्या गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. 'कमाता हू बहोत कुछ पर.. कमाई डूब जाती है.. कुछ इन्कम टॅक्स ले जाता है.. कुछ बीबी उडाती है ' असे या गाण्याचे बोल आहेत. 1954 साली आलेल्या 'अधिकार' चित्रपटातील हे गाणं आजच्या वाढत्या महागाईच्या काळात अगदी फिट बसतं. त्यामुळे या गाण्यावरचे एक ना अनेक रिल्स सध्या व्हायरल होत आहेत. प्रसाद आणि त्याची बायको मंजिरी या दोघांनाही या गाण्यावर रील करण्याचा मोह आवरला नाही.

या रीलला प्रसादने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. सरकारनी ठरवलं तर टॅक्स कंट्रोल होऊ शकतो...पण बायको????????, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.  सध्या या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहा तर मग...

प्रसाद ओक एक उत्तम अभिनेता आहेच. तितकाच उत्तम दिग्दर्शकही आहे. निर्मिती, लेखन, गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याने दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी हा सिनेमा अफाट गाजला. शिवाय त्याच्या धर्मवीर सिनेमानेही धूम केली होती. सध्या तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिका पार पाडतोय. प्रसाद ओकने काही दिवसांपूर्वी 'धर्मवीर' या गाजलेल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. आता चाहत्यांना दुसऱ्या भागात काय पहायला मिळतंय याची उत्सुकता लागली आहे. 

Web Title: marathi actor prasad oak shared reel with wife manjiri about income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.