अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीत झळकणार मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:49 PM2019-05-07T19:49:04+5:302019-05-07T19:50:04+5:30

बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी प्रत्येक कलाकाराला एकदा तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. ही इच्छा नुकतीच मराठी अभिनेत्याची पूर्ण झाली आहे.

Marathi actor appear in an advertisement with Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीत झळकणार मराठी अभिनेता

अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीत झळकणार मराठी अभिनेता

googlenewsNext


मराठी चित्रपट, हिंदी वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता राहुल पेठे लवकरच एका जाहिरातीत झळकणार आहे. ही जाहिरात त्याच्या करियरमधील सर्वात स्पेशल आहे. याचे कारण म्हणजे या जाहिरातीत तो बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. 

बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी प्रत्येक कलाकाराला एकदा तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. ही इच्छा नुकतीच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता राहुल पेठेची पूर्ण झाली आहे. त्याची ही इच्छा बिग बींसोबत कौन बनेगा करोडपतीच्या जाहिरातीच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.

आपल्या या अनुभवाबद्दल राहुल सांगतो की, इतके मोठे अभिनेते असूनही 'मी' पणाचा लवलेश त्यांच्यात जराही नव्हता. त्यांचे अफाट व्यक्तिमत्व आहे. अशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी आमचे दिग्दर्शक विजय मौर्य सरांना धन्यवाद देईन. भविष्यातही मला त्यांच्यासोबत आणखी काम करण्याची संधी मिळावी आणि पुढे अनेक चांगली कामे माझ्याकडून व्हावी अशी इच्छा आहे.

राहुलचा नुकताच '१५ ऑगस्ट' नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

लवकरच राहुल 'मनाचे श्लोक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने तो पुन्हा एकदा मृण्मयी देशपांडेसोबत पडद्यावर झळकणार आहे.

Web Title: Marathi actor appear in an advertisement with Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.