मानसी नाईकची झक्कास राइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 13:35 IST2017-01-16T13:35:17+5:302017-01-16T13:35:17+5:30

प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यात एकदा तरी आपण विमान, हेलिकॉप्टरची राइड घ्यावी. एकदा तरी आपण हवेत उडावे असे ...

Mansi Naik's Jharkas Ride | मानसी नाईकची झक्कास राइड

मानसी नाईकची झक्कास राइड

रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यात एकदा तरी आपण विमान, हेलिकॉप्टरची राइड घ्यावी. एकदा तरी आपण हवेत उडावे असे स्वप्न मनाशी ठेवून प्रत्येकजण जगत असतो. कलाकारांच्या बाबतीत हे स्वप्न साहजिकच पूर्ण होतात. अशी एक हवेतील राइड प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक हिने एन्जॉय केली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच सोशलमीडियावर हेलिकॉप्टरसहित एक फोटो अपलोड केला आहे. तसेच या फोटोसोबत तिने एक पोस्ट ही अपडेट केली आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते, वींथ माय जॉय राइड. तसेच तिने ही हेलिकॉप्टरची सवारी एकदम मराठीमोळया पेहरावात केली असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोला झक्कास, सुंदर असा कमेंन्टदेखील मिळत आहेत. मानसीने नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचे दिसत आहे. सध्या मानसीचे बाई वाडयावर या...हे गाणे खूपच कल्ला करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना दिसत आहे. तसेच तिचे बघतोय रिक्षावाला या गाण्यालादेखील तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आज ही हे गाणे प्रेक्षक विसले नाहीत. तिने नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठेका चुकविला आहे. नुकतेच तिचा व्रज हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती तिच्या खास शैलीत मुजरा करताना दिसत आहे. तिचा हा मराठमोळा मुजरा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 





Web Title: Mansi Naik's Jharkas Ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.