‘मांजा’चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, सिनेमातून अश्विनी भावे उलगडणार बंध नात्याचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 15:54 IST2017-05-30T10:24:33+5:302017-05-30T15:54:33+5:30
'ध्यानीमनी' या मराठी सिनेमानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री अश्विनी भावे रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच ध्यानीमनी सिनेमाने रसिकांचे लक्ष ...

‘मांजा’चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, सिनेमातून अश्विनी भावे उलगडणार बंध नात्याचे
' ;ध्यानीमनी' या मराठी सिनेमानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री अश्विनी भावे रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच ध्यानीमनी सिनेमाने रसिकांचे लक्ष वेधले होते.प्रेक्षकांसहित बॉलिवुड आणि मराठी कलाकारदेखील या चित्रपटाच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. आगामी मराठी सिनेमा मांजामधून त्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. मांजा या चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सोशलसाईट्सवर या पोस्टरला अनेक लाईक्स आणि प्रतिक्रीयाही मिळत आहेत.रेशमाच्या नात्याला संवादाची धार अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाबाबत आणि अश्विनी भावे यांच्या भूमिकेविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमाचा विषय वेगळा आणि आजवर कधीही मांडण्यात आलेला नसल्याचा दावा निर्माता दिग्दर्शकांकडून करण्यात आलाय. अश्विनी भावे यांच्यासोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुदगलकरसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. सिनेमाची कथा-पटकथा, आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक जतिन वागळे यांनी सांभाळली आहे. ‘इंडिया स्टोरीज’ निर्मित मांजा सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी सिनेमाची निर्मिती केलीय. काही वर्षांपूर्वी अश्विनी भावे यांनी एनआयर किशोर बोर्डीकर यांच्यासोबत लग्न केलं आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको इथं स्थायिक झाल्या. 90 च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली. मराठीसह हिंदी सिनेमातही त्यांच्या अभिनयावर रसिक फिदा झाले. 1987 साली राजलक्ष्मी या सिनेमातून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर किस बाई किस, अशी ही बनवाबनवी, कळत नकळत, झुंज तुझी माझी, वजीर यासारख्या सिनेमात काम केलं होतं.