मंगेश देसाई करतोय मतदान करण्यासाठी जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2017 06:25 AM2017-02-05T06:25:35+5:302017-02-05T11:55:35+5:30

सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण रंगत आहे. सगळीकडे प्रचाराची धूम निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपला उमेदवार निवडून यावा ...

Mangesh Desai is campaigning for public awareness | मंगेश देसाई करतोय मतदान करण्यासाठी जनजागृती

मंगेश देसाई करतोय मतदान करण्यासाठी जनजागृती

googlenewsNext
्या राज्यात निवडणुकीचे वातावरण रंगत आहे. सगळीकडे प्रचाराची धूम निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सडेतोड मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. मात्र नागरिक याकडे लक्ष न देता निवणुकीचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून बाहेरगावी जाणे पसंत करत असल्याचे पाहायला मिळतात. अशाच काही नागरिकांना जागे करण्यासाठी कलाकारांनी पुढाकार घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.
     
          मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांची ही जबाबदारी पटवून देण्यासाठी अभिनेता मंगेश देसाई याने नुकतेच सोशलमीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तो नागरिकांना मतदान करण्याचे महत्व पटवून देताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगेश या व्हिडीओच्या माध्यमातून सांगतो, निरोगी शरीरासाठी जशी व्यायामाची गरज असते, त्याप्रमाणे प्रगल्भ लोकसेवेसाठी मतदान करण्याची आवश्यकता असते. तुमचे मत, तुमची ताकद असते. असा संदेश तो नागरिकांपर्यत पोहविण्याचा प्रयत्न करत आहे.
       
            मंगेश देसाई याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच काही महिन्यांपूर्वीच त्याचा एक अलबेला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवुडची तगडी अभिनेत्री विदया बालन झळकली होती. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे.अभिनेत्री विदया बालन हिने या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले आहे. तसेच तो लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊड, सिड्रेला, एक तारा, बायस्कोप अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याने नाटकांच्या माध्यमातूनदेखील रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. 

Web Title: Mangesh Desai is campaigning for public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.