मनवा पहिल्यांदाच करणार छोटया पडदयावर निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 11:04 IST2016-12-08T10:40:45+5:302016-12-08T11:04:58+5:30
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मनवा नाईक ही लवकरच छोटया पडदयावर निर्मिती करताना दिसणार आहे. चुकभूल द्यावी घ्यावी या नाटकावर आधारित ...
.jpg)
मनवा पहिल्यांदाच करणार छोटया पडदयावर निर्मिती
प रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मनवा नाईक ही लवकरच छोटया पडदयावर निर्मिती करताना दिसणार आहे. चुकभूल द्यावी घ्यावी या नाटकावर आधारित तिची मालिका असणार आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले आबा हे पात्र आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिका संपून आज पंधरा वर्षे झाली तरी तसे आबा पुन्हा कधी पडद्यावर आले नाहीत, मात्र आता दिलीप प्रभावळकर हे एक दोन नाही तर तब्बल पंधरा वर्षानी छोटया पडदयावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आश्चर्य म्हणजे चुकभूल द्यावी घ्यावी या प्रभावळकरांच्याच नाटकावर आधारित नवीन मालिका असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेची अधिक उत्सुकता असणार आहे हे मात्र नक्की. चुकभूल द्यावी घ्यावी या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी मधुगंधा कुलकर्णी यांच्यावर आहे. या मालिकेचे शीर्षकगीतही सुरेश वाडकर यांच्या साथीने दिलीप प्रभावळकर गाणार आहेत. विषेश म्हणजे मनवाने यापूर्वी पोरबाजार या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचप्रमाणे तिने काही लघुपटाचेदेखील दिग्दर्शन ही केले आहेत. तसेच मनवा ही अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांतून प्रेक्षकांना अभिनय करताना पाहायला मिळाली आहे. यापूर्वी ती क्षणभर विश्रांती, नो एंट्री पुढे धोका आहे, शासन, पिंडदान, जाऊ दया ना बाळासाहेब या चित्रपपटांमध्ये प्रेक्षकांना दिसली आहे. तसेच तिने बा बहू और बेबी, तीन बहुरानिया या हिंदी मालिकेतदेखील झळकली आहे. त्यामुळे मनवाचा हा छोटया पडदयावरचा निर्मितीचा प्ऱयत्न नक्कीच तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरणार हे मात्र नक्की.