मकरंद अनासपुरेचा ‘पाणी बाणी’ चित्रपट या तारखेला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:25 IST2018-06-07T08:55:20+5:302018-06-07T14:25:20+5:30
मकरंद अनासपुरे, तेजा देवकर, रविंद्र मंकणी, रवीराज आणि ज्योत्स्ना राजोरीया यांचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ ८ जून २०१८ पासून ...

मकरंद अनासपुरेचा ‘पाणी बाणी’ चित्रपट या तारखेला होणार प्रदर्शित
म रंद अनासपुरे, तेजा देवकर, रविंद्र मंकणी, रवीराज आणि ज्योत्स्ना राजोरीया यांचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ ८ जून २०१८ पासून महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही गावात ठाण मांडून बसलेल्या जीवघेण्या दुष्काळाची आहे. आजवर मराठी चित्रपटामधून बरेच नवनवीन विषय हाताळले गेले आहेत असाच एका डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सदानंद दळवी आणि प्रज्योत कडू असून निर्माते अतुल दिवे आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार आणि गायक म्हणून कार्यरत असलेल्या अतुल दिवेंनी आता चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. ‘स्वरसाक्षी’ प्रॉडक्शन बॅनरखाली ‘पाणी बाणी’ नावाचा चित्रपट त्यांनी तयार केला असून त्यांनी या चित्रपटाद्वारे जलसंवर्धनाचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. आता पर्यंत अतुल दिवे यांची १५०० गाणी रेकॉर्ड झाली असून ३५०० गाण्याचे प्रोग्राम त्यांनी केलेले आहेत.
या चित्रपटातील गीतांना अतुल दिवे यांनी गीतबद्ध केले असून अतुल दिवे यांनी वैशाली माडेच्या सोबत या चित्रपटाची गाणी गायली आहेत. संगीत संयोजनामध्ये शिव राजोरीया आणि मधु रेडकर यांनी अतुलज दिवे यांना सहकार्य केले आहे. या चित्रपटाचे संगीत झी म्युझिक कंपनी मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचले आहे. या चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना अतुल दिवे सांगतात, “ सामाजिक बांधिलकी आणि ज्वलंत समस्येला केंद्रस्थानी ठेवून पाणी बाणीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज शहरात आणि खेडोपाड्यात पाणीटंचाई भीषण आहे. पाणीस्त्रोताचे संवर्धन आणि नवीन स्त्रोताची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे थेंब न थेंब साठवले पाहिजे तेव्हाच सगळीकडे आनंदी आनंद पसरू शकले. यावरच आधारित पाणी बाणी हा चित्रपट आहे.”
या चित्रपटाच्या दाखवण्यात आले आहे की, गावात अनेक वर्ष पाऊस आलेला नाही. दुष्काळाला कंटाळून येथील तरुण गाव सोडून चालले आहेत. त्याच वेळी बाहेरून आलेला एक तरुण गावातील लोकांना आश्वासन देतो की, मी तुमच्या सर्वांच्या मदतीने दुष्काळावर मात करेन. मात्र गावातील जमीनदार या तरुणाचा डाव उलथून टाकण्याचा सतत प्रयत्न करतात. परंतु गावकऱ्यांच्या साथीने तरुण गावाला दुष्काळ मुक्त करतो. यात त्या तरुणाची भूमिका मकरंद अनासपुरेने साकारली असून या चित्रपटाचा हा नायक श्रमदानातून गावात जलयुक्त शिवार निर्मितीसाठी झटत आहे. नायकाचा डाव उलथून टाकणाऱ्या जमीनदाराची भूमिका रविंद्र मंकणी साकारात आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येकवेळी नायकाच्या पाठीशी उभी राहणारी आणि सरपंचाच्या मुलीची भूमिका तेजा देवकरने बजावली आहे. जलसंवर्धनाचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.
Also Read : सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांचा जुना फोटो पाहिला का?