ते 'साऊथ'चे सिनेमे बघायला जातात, पण मराठी सिनेमाला येत नाहीत; महेश मांजरेकर प्रेक्षकांबद्दल स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 01:11 PM2022-08-05T13:11:41+5:302022-08-05T13:12:17+5:30

Mahesh Manjrekar on Marathi cinema, Marathi audience: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का 2’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. याचनिमित्ताने महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटांबद्दल केलेलं एक वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

Mahesh Manjrekar speaks about Marathi cinema, Marathi audience De Dhakka 2 | ते 'साऊथ'चे सिनेमे बघायला जातात, पण मराठी सिनेमाला येत नाहीत; महेश मांजरेकर प्रेक्षकांबद्दल स्पष्टच बोलले

ते 'साऊथ'चे सिनेमे बघायला जातात, पण मराठी सिनेमाला येत नाहीत; महेश मांजरेकर प्रेक्षकांबद्दल स्पष्टच बोलले

googlenewsNext

2008 साली ‘दे धक्का’ हा सिनेमा आला आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. सुमारे 14 वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल अर्थात ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आज शुक्रवारी (5 ऑगस्ट) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. याचनिमित्ताने महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटांबद्दल केलेलं एक वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

दे धक्का 2’च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये महेश मांजरेकर मराठी चित्रपट, मराठी प्रेक्षक याबद्दल बोलले. प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांत जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

साऊथचे सिनेमे चालतात अन्...
गेल्या काही दिवसांत साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडलाही घाम फोडला आहे. या पार्श्वभूमीवर महेश मांजरेकर बोलले. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकत नाही, हे वास्तव आहे. तेच प्रेक्षक साऊथचे सिनेमे बघायला मात्र चित्रपटगृहांत जातात. साऊथचे सिनेमे यशस्वी होत आहेत, याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. साऊथचे काही फार दम नसलेले सिनेमेही उत्तम जाहिरातीच्या जोरावर बक्कळ पैसा कमवत आहेत. साऊथचे निर्माते त्यांच्या चित्रपटाची उत्तम जाहिरात, प्रमोशन करून पैसे कमवतात, असं ते म्हणाले.

मराठी प्रेक्षक मराठी सिनेमे पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातात का?
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक दमदार सिनेमांची निर्मिती होत आहे. विनोदी, ऐतिहसिक अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण प्रेक्षक हे सिनेमे पाहायला चित्रपटगृहांत जातात का? हा खरा प्रश्न आहे. मराठीत उत्तम चित्रपट प्रदर्शित होत नाही, असं काहीही नाही. पण प्रेक्षक आहेतच कुठे? मराठी चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन पाहण्यासारखे नसतात, हे लोकांनी आधीच ठरवून टाकलं आहे. मी मान्य करतो, तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण असं काही मत मांडण्याआधी एकदा चित्रपट तरी पाहा. मराठीतील अनेक निर्माते दिग्दर्शक वेगवेगळे विषय, कथा प्रेक्षकांपर्यंत पाहोचू पाहत आहेत. पण मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतो, हे अतिशय वेदनादायी आहे, असं मांजरेकर यावेळी म्हणाले.

Web Title: Mahesh Manjrekar speaks about Marathi cinema, Marathi audience De Dhakka 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.