महेश मांजरेकर सांगतात, प्रेक्षक नाटकाशी प्रामाणिक असल्याने चित्रपट बनविणे हे माझ्यासाठी आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 10:58 IST2017-01-16T10:58:31+5:302017-01-16T10:58:31+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव हे रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या महोत्सवातील चर्चासत्रात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला असल्याचे दिसत ...

महेश मांजरेकर सांगतात, प्रेक्षक नाटकाशी प्रामाणिक असल्याने चित्रपट बनविणे हे माझ्यासाठी आव्हान
प णे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव हे रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या महोत्सवातील चर्चासत्रात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला असल्याचे दिसत आहेत. तसेच आपल्या आवडत्या कलाकारांचे चित्रपटाविषयी असणारे मत, त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी तरूणाईदेखील उत्सुक असल्याचे महोत्सवच्या प्रतिसादातून पाहायला मिळाले. नुकतेच या महोत्सवच्या चर्चासत्राला आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक अनुभव शेअर केले असल्याचे दिसले. या महोत्सवाच्या चर्चासत्रात प्रेक्षकांचे लाडके कलाकार महेश मांजरेकर सांगतात, नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर करताना नटसम्राट या नावाने मला भुरळ पाडली. त्याचप्रमाणे प्रेक्षक नाटकाशी प्रामाणिक असल्याने चित्रपट बनविणे हे माज्यासमोरचे मोठे आव्हान होते. तसेच बेलवलकर हे पात्र नाटकात गॉडली दाखविण्यात आले होते. मी मात्र चित्रपटात त्याला ग्रे शेड दिली, कारण दिग्दर्शक म्हणून मला ते गरजेचे वाटले. आज साहित्यकृती चांगल्या दर्जाच्या होत नाहीत म्हणून माध्यमांतराची गरज आहे असे मानणे चुकीचे आहे. विषय संपलेले नाही, त्या विषयापलीकडे, स्टेजपलीकडे जाऊन चित्रपटाची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या महेश मांजरेकर यांच्या ध्यानीमनी या चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री आश्विनी भावे ही पुन्हा चित्रपटसृष्टीत पुर्नगमन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यांनी स्वत:च केले आहे. हा चित्रपटत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडेदेखील झळकणार आहेत.