​ ध्यानीमनी चित्रपटात महेश-अश्विनीची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 13:36 IST2017-01-07T13:36:13+5:302017-01-07T13:36:13+5:30

महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे या दोघांचीही जोडी आगामी मराठी चित्रपटासाठी जमली आहे. ध्यानीमनी या मराठी चित्रपटामध्ये हे दोघेही ...

Mahesh-Ashwini's Jamalya pair in Dhyanimni film | ​ ध्यानीमनी चित्रपटात महेश-अश्विनीची जमली जोडी

​ ध्यानीमनी चित्रपटात महेश-अश्विनीची जमली जोडी

ेश मांजरेकर आणि अश्विनी भावे या दोघांचीही जोडी आगामी मराठी चित्रपटासाठी जमली आहे. ध्यानीमनी या मराठी चित्रपटामध्ये हे दोघेही सशक्त भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहेत. अश्विनी भावे सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक असतात. या चित्रपटातून त्या बºयाच वर्षांनंतर रुपेरी पडदयावर पुनरागमन करणार आहेत. अनेक मराठी चित्रपटांमध्ये अश्विनीच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दिसली आहेच. तिने प्रत्येक चित्रपटामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतू अमेरिकेमध्ये गेल्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसलीच नाही. एक मोठा ब्रेक अश्विनीने घेतल्यानंतर ध्यानीमनी या चित्रपटातून ती पुन्हा एकदा अभिनय करण्यास सज्ज झाली आहे. तर महेश मांजरेकर अभिनेत्या सोबतच दिग्दर्शक देखील आहेत. प्रेक्षकांनी  महेश मांजरेकर यांच्या अनेक चित्रपटांना पसंती दर्शवीली आहे. नटसम्राट या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. सध्या ते एफयु या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व़्यस्त आहेत. या चित्रपटाची तर प्रदर्शनावूर्वीच चर्चा रंगली आहे. सर्वांचा लाडका परशा म्हणजेच आकाश ठोसर या चित्रपटात एका हटके भूमिकेत त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. त्यामुळेच महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शनातून वेळ काढीत ध्यानीमनी या चित्रपटामध्ये रोल केला आहे. महेश मांजरेकर हे दिग्गज अभिनेते असल्याचे आपण त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून पाहतोच. हिंदी-मराठी अशआ सगळ््याच चित्रपटांत ते दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. ध्यानीमनी या चित्रपटाची निमिर्ती देखील महेश मांजरेकर यांनीच केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे आहेत तर अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अश्विनी भावे, तसेच मृण्मयी देशपांडे आणि अभिजीत खांडकेकर हे या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Mahesh-Ashwini's Jamalya pair in Dhyanimni film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.