​ महाभारत चित्रपट महोत्सवाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:26 IST2016-12-22T14:26:08+5:302016-12-22T14:26:08+5:30

प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ््या विषयांवरील चित्रपट पाहण्यामध्ये रस असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आपल्याकडे देखील बºयाच अनोख्या कथांवर चित्रपट आलेले ...

The Mahabharata Film Festival started shortly | ​ महाभारत चित्रपट महोत्सवाला लवकरच सुरुवात

​ महाभारत चित्रपट महोत्सवाला लवकरच सुरुवात

रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ््या विषयांवरील चित्रपट पाहण्यामध्ये रस असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आपल्याकडे देखील बºयाच अनोख्या कथांवर चित्रपट आलेले आहेत. विनोदी, प्रेमकथा, रहस्य, अ‍ॅक्शन, पौराणिक, ऐतिहासिक अशा कथांना प्रेक्षकांनी पसंतीच दशर्विली आहे. महाभारत हा तर आपल्या प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आणि औत्सुक्याचा विषय. या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट निघाले आणि त्यांना रसिकांची उत्तम दाद मिळाली. याच चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा या हेतूने पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे शुक्रवारपासून (२३ डिसेंबर) तीन दिवसांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) येथे शुक्रवारी (२३ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता पौराणिक समाज, धर्म या विषयांचे अभ्यासक आणि एपिक वाहिनीवरील देवलोक हा कार्यक्रम करणारे डॉ. देवदत्त पटनाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संतोष अजमेरा या वेळी उपस्थित राहणार आहेत. अ थ्रो आॅफ डाईस या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होईल. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची शताब्दी आणि महाभारताची चिकित्सक आवृत्ती संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सुवर्णमहोत्सव झाल्याच्या निमित्ताने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारपासून (२४ डिसेंबर) तीन दिवस एफटीआयआय येथेच सकाळी साडेदहा ते रात्री नऊ या वेळात हा महोत्सव होणार आहे. महोत्सव सवार्साठी खुला आणि विनामूल्य असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.   या चित्रपट महोत्सवामध्ये दाखविण्यात येणाºया चित्रपटांमधून महाभारत हा कालातीत विषय आहे हे पुन्हा एकदा समोर येत आहेत.  यांतील अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: The Mahabharata Film Festival started shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.