​ सौरभ-अनुजाची महाबळेश्वर सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:56 IST2016-12-06T12:56:07+5:302016-12-06T12:56:07+5:30

सध्या सगळीकडे गुलाबी थंडीचे वातावरण आहे. मस्त कुठेतरी फिरायला जाऊन रिलॅक्स करण्याची इच्छा या मौसमात सर्वांनाच होत असते. आता ...

Mahabaleshwar Yatra of Saurabh-Anuj | ​ सौरभ-अनुजाची महाबळेश्वर सफर

​ सौरभ-अनुजाची महाबळेश्वर सफर

्या सगळीकडे गुलाबी थंडीचे वातावरण आहे. मस्त कुठेतरी फिरायला जाऊन रिलॅक्स करण्याची इच्छा या मौसमात सर्वांनाच होत असते. आता हेच पाहा ना आपले आवडते कलाकार देखील सध्या सुट्ट्या एंजॉय करण्यासाठी मस्त फिरायला जात आहेत. अभिनेता सौरभ गोखले आणि अनुजा साठे हे मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल ट्रीप एंजॉय करण्यासाठी महाबळेश्वरला गेले आहेत , महाबळेश्वर ही तर बºयाच जणांची आवडती जागा आहे. झक्कास निसर्गाच्या मनोहरी वातावरणात सर्व काही विसरुन वेळ घालविण्यासारखा दुसरा आनंद काहीच नाही. कलाकारांना मात्र त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे फारसा कुठे जायला आणि फिरायला वेळ मिळत नाही आणि कधी वेळ मिळालाच तर मग काय लगेचचे सितारे फॅमिली सोबत धमाल मस्ती करायला बॅग पॅक करुन लगेचच हॉलिडेला निघतात. अशीच महाबळेश्वरची ट्रीप सध्या सौरभ आणि अनुजा एंजॉय करताना दिसत आहेत. बरं या दोघांचे महाबळेश्वर हे ठिकाण फारच आवडीचे असल्याचे त्यांनी सोशल साईट्सवर सांगितले आहे. सौरभ सांगतोय, मच निडेड ब्रेक अफ्टर लाँग टाईम. खरंच आहे म्हणा, कामाच्या व्यापातून आणि तणावातून रिफ्रेश होण्यासाठी प्रत्येकालाच एका ब्रेकची तर गरज असतेच ना. तसाच वेळ काढून सध्या हे दोघेही महाबळेवरच्या निसर्गरम्य वातावरणाचा पुरेपुर आनंद घेत अहेत. नुकतीच अभिनेत्री सई ताम्हणकर उत्तरांचलला जाऊन आली तर सिदधार्थ चांदेकर राजस्थानला गेला आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीत फिरायला जाण्याचा मोसम आला कि काय असाच प्रश्न पडला आहे.

 

Web Title: Mahabaleshwar Yatra of Saurabh-Anuj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.