नैतिकता व महत्त्वाकांक्षांची अनोखी कथा असलेला 'चुंबक' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्‍ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:10 PM2021-11-11T16:10:05+5:302021-11-11T16:10:26+5:30

'चुंबक' ही किशोरवयीन रेस्‍टॉरण्‍ट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे.

'Magnet', a unique story of ethics and ambition, is ready for release | नैतिकता व महत्त्वाकांक्षांची अनोखी कथा असलेला 'चुंबक' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्‍ज

नैतिकता व महत्त्वाकांक्षांची अनोखी कथा असलेला 'चुंबक' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्‍ज

googlenewsNext

नैतिकता व महत्त्वाकांक्षा यामधून एकाची निवड करण्‍याच्‍या सातत्‍यपूर्ण संघर्षाबाबतची कथा घेऊन येत आहे सोनी लिव्‍हवरील पुरस्‍कार-प्राप्‍त म‍राठी चित्रपट 'चुंबक'. राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते दिग्‍दर्शक संदीप मोदी यांचे दिग्‍दर्शन आणि अक्षय कुमार प्रस्‍तुत चित्रपट 'चुंबक'मध्‍ये साहिल जाधव, स्‍वानंद किरकिरे आणि संगम देसाई प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ नोव्‍हेंबर २०२१ रोजी सो‍नीलिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

'चुंबक' ही किशोरवयीन रेस्‍टॉरण्‍ट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे. तो त्‍याचे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी लोकांची फसवणूक करण्‍याचे ठरवतो. त्‍याचा एकमेव बळी ठरलेले प्रसन्‍न (स्‍वानंद किरकिरे) यांच्‍याशी सामना होतो. प्रसन्‍न हे बौद्धिक अक्षमता असलेले वृद्ध आहेत. त्‍यानंतर बाळू नैतिकता व स्‍वप्‍नांच्‍या दुविधेमध्‍ये अडकून जातो. दोघेही एका प्रवासावर निघून जातात, जो त्‍यांच्‍या जीवनाला कायमस्‍वरूपी कलाटणी देतो. बाळू त्‍याच्‍या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍यासाठी निरागस व्‍यक्‍तीची फसवणूक करेल का की त्‍याचे मन बदलेल? 
या चित्रपटाबद्दल स्वानंद किरकिरे यांनी सांगितले की, खरं सांगायचं तर अडचणी तशा आल्या नाहीत. मात्र, मला बराच मोठा आणि महत्त्वाचा रोल देऊ केला होता. प्रसन्ना ठोंबरे हे पात्र अत्यंत महत्त्वाचं असं पात्र आहे. त्याभोवती संपूर्ण कथानक फिरते. गतिमंद असलेल्या प्रसन्नाचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी मी आणि माझे दिग्दर्शक संदीप मोदी आम्ही अनेक लोकांना, डॉक्टर्सना भेटलो. त्यावर अभ्यास केला. पण, मजा आली एक वेगळी भूमिका करायला मिळाली.
कायरा कुमार क्रिएशन्‍सचे नरेन कुमार निर्मित 'चुंबक' हा केप ऑफ गुड फिल्‍म्‍स प्रॉडक्‍शनचा चित्रपट आहे. नैतिकता व महत्त्वाकांक्षांमधील संघर्षाबाबतचा हा हृदयस्‍पर्शी ड्रामा १२ नोव्‍हेंबर २०२१ पासून फक्‍त सोनीलिव्‍हवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Magnet', a unique story of ethics and ambition, is ready for release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.