लव्हगुरु सुमेध गायकवाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:19 IST2018-04-09T09:49:19+5:302018-04-09T15:19:19+5:30
जिथे लव्ह आला, तिथे लफडा झालाचं! असं आपला लव्हगुरु सुमेध गायकवाड तरुणाईला सांगतोय. सुमेध ‘लव्ह लफडे’ या चित्रपटाच्या निमित्ताने ...

लव्हगुरु सुमेध गायकवाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ज थे लव्ह आला, तिथे लफडा झालाचं! असं आपला लव्हगुरु सुमेध गायकवाड तरुणाईला सांगतोय. सुमेध ‘लव्ह लफडे’ या चित्रपटाच्या निमित्ताने तरुणाईला प्रेमाचे धडे, लव्ह फंडे देताना दिसणार आहे. कॉलेजकट्टा, कॉलेजमधली मुलांची मैत्री, पहिलं प्रेम, नातेसंबंध, तरुणाईच्या मनातील घालमेल, खरं प्रेम म्हणजे नक्की काय? हळूवार प्रेमाची भाषा, त्या मागची भावना या सगळ्यांची धम्माल ‘लव्ह लफडे’ चित्रपटामध्ये सुमेध गायकवाड करणार आहेत.
अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा, मोरया या चित्रपटामधून सुमेध गायकवाडची अभिनय क्षेत्राची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर संतोष माईनकर दिग्दर्शित ‘प्रेम ऍट फर्स्ट साईट’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत, प्रसाद आचरेकर दिग्दर्शित ‘अकल्पित’ ह्या चित्रपटात सुमेध आपल्याला दिसला. हिंदीतील ‘गुमराह’ सारख्या मालिकेन मध्ये ही त्याने काम केलं आहे. स्वप्नांच्या वलयाचं सत्यात रूपांतर करणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. पण 'एक एक पाऊल पुढे टाकले की त्या स्वप्नांपर्यंतचं अंतर कमी होतं' असं म्हणतात. हीच भावना उराशी बाळगून सुमेध गायकवाड ह्या तरुणाने फोटोग्राफर ते पब्लिसिटी डिझायनर ते प्रोड्युसर ते ऍक्टर हा प्रवास अनुभवला. फोटोग्राफी मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावूनही सुमेधने त्याचं ऍक्टिंगचं स्वप्नं सोडलं नाही, त्याने आपली वाटचाल त्या दिशेने सुरूच ठेवली.
२०१५ मध्ये सॅक्रेड बुद्धा क्रीएशन प्रोडक्शन स्थापन केले आहे. त्यातून ‘लव लफडे’ नावाचा पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे लेखन संजय मोरे यांनी तर दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट एचसीसी नेटवर्क ऍपद्वारे आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे. ऍपद्वारे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.