लव मी हे एक सामाजिक नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 15:50 IST2016-12-20T15:50:41+5:302016-12-20T15:50:41+5:30
लव मी हे एक सामाजिक आणि कौटुंबिक विषय असलेले दोन अंकी नाटक आहे. सामाजिकतेचे भान ठेऊन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर ...

लव मी हे एक सामाजिक नाटक
ल मी हे एक सामाजिक आणि कौटुंबिक विषय असलेले दोन अंकी नाटक आहे. सामाजिकतेचे भान ठेऊन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले जाणारे हे फक्त नाटक नसून ती एक सामाजिक चळवळ आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर एखादा आजार झाल्यास, त्या व्यक्तीस व तिच्या कुटुंबियांस समाजातील कोणत्या-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे काही आजारांबद्दल जनमानसांत असणाºया गैरसमजामुळे त्या आजारी व्यक्तीस मिळणारी गैरवर्तणूक किती अयोग्य आहे ह्याचा आरसा समाजासमोर ठेऊन समाजातील अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आलेआहे. कष्टसाध्य आजार झलेली व्यक्ती देखील एक माणूसच आहे. तिला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर त्या व्यक्तीस योग्य औषोधोपचार, प्रेम, आधार मिळाला तर ती देखील इतर व्यक्तींप्रमाणेच सुखकर आयुष्य जगू शकते. हा विचार या नाटकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. डॉ. संदीप हरणे यांनी या नाटकाचे लेखन व गणेश तळेकर यांच्यासमवेत शीतल एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मिती केली. डॉ. संदीप हरणे यांनी स्वत: ह्या नाटकाची गाणी लिहिलेली असून अभिनय देखील केलेला आहे. दिग्दर्शक श्रावण पेडामकर येणी या नाटकाचे दिग्दर्शन केलेले असून नेपथ्य पालेकर, तर संगीताची धुरा श्री एकनाथ दयाळकर यांनी सांभाळलेली आहे. श्री एकनाथ दयाळकर, डॉ. संदीप हरणे आणि नम्रता दास यांनी पार्श्वगायन केलेले आहे. वेशभूषा अनिल मुळीक तर रंगभूषा अनिल आरोसकर यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे डॉ. संदीप हरणे, शुभांगी कोलते, रुपेश मिरकर, वर्ष गावकर, श्रीकांत आढव आणि परम इंगळे इत्यादी कलाकार मंडळींनी या नाटकात काम केलेले आहे.