बोल्ड अंदाजातील भुमिका करताना छान वाटते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:26 IST2016-07-21T07:55:45+5:302016-07-21T13:26:49+5:30

 प्रियांका लोंढे                   लहानग्यांची सोनपरी तर घराघरात पोहचलेली सालस अवंतीका आजही प्रेक्षक ...

Looks good when playing a bold guess | बोल्ड अंदाजातील भुमिका करताना छान वाटते

बोल्ड अंदाजातील भुमिका करताना छान वाटते

 प्रियांका लोंढे

           
      लहानग्यांची सोनपरी तर घराघरात पोहचलेली सालस अवंतीका आजही प्रेक्षक विसरु शकले नाहीत. मृणाल कुलकर्णी यां आजपर्यंत वेगळ््या धाटणीच्या भुमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. अभिनयातून थेट दिग्दर्शनाची धुरा पेललेल्या मृणालजीं आता पुन्हा एकदा अ‍ॅन्ड जरा हटके या चित्रपटातून एका वेगळ््या भुमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाविषयी मृणाल कुलकर्णी यांच्याशी सीएनएक्सने साधलेला हा मनमोकळा संवाद.

 १. या चित्रपटातील तुझ्या भुमिकेविषयी काय सांगशील ?
-: मीरा अन आकाश हे दोघे कॉलेज फ्रेन्ड्स चाळीशीमध्ये भेटतात अन मग लग्न करायचा निर्णय घेतात. मीराने तीच्या घटस्पोटानंतर एकटीने मुलीला वाढवलेले असते तर आकाशची बायको गेल्यावर त्याचा मुलगा देखील एकटाच वाढलेला असतो. अन या दोघांच्या निर्णयाचा त्यांची मुले कशाप्रकारे स्वीकार करतात अशी ही कथा आहे.

 २. हिंदी मध्ये देखील असे विषय येऊन गेलेत पण  यात काय वेगळेपण आहे ?
 -:  होय हे बरोबरच आहे. बासु चॅटर्जींचे चित्रपट तुम्हाला आठवले हे खरे आहे. गोलमाल किंगा खट्टा मिठ्ठ यासारखे चित्रपट हिंदीत याआधी येऊन गेलेत परंतू हा चित्रपट त्या पठडीतील नाही. एलका फुलका अन तरल विषय यात दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.  

 ३. नाती आता बोल्ड होत आहेत, या बदलणाºया नात्यांविषयी तु काय सांगशील ?
 -: माणसाला जोडीदाराची गरज असते. त्यामुळे कोणाच्या आयुष्यात असा काही प्रसंग आलाच तर त्यांनी पुन्हा एकदा जोडीदार शोधला तर चांगलीच गोष्ट आहे. सर्वांनीच वाईड दृष्टीकोन ठेवला पाहिजे. स्वत:चा विचार करणारी नायिका आता लोकांना आवडु लागलीय. अशीच यातील नायिका आहे जी प्रेक्षकांना नक्कीच अपील होईल.

 ४. या चित्रपटाच्या विषयाला प्रेक्षक निगेटिव्ह घेतील अशी भीती नाही वाटत का ?
 -: या चित्रपटात एक तरल संवेदनशील कथा दाखविण्यात आली आहे. यातील चारही कॅरेक्टर अतिशय समजुतदार आहेत. अन बोल्डनेस म्हणाल तर यात काही फिजिकल किंवा बोल्ड सीन्स नाहीत. तर बोल्डनेस हा विचारात देखील असतो. आम्ही दोघे आता लग्न करतोय हा बोल्ड विचार  ते दोघे मुलांना सांगतात. त्यामुळे या विषयाला प्रेक्षक निगेटिव्ह नाही घेऊ शकणार. ही भावनांची गोष्ट आहे. 

 ५.  इंद्रनीलची निवड या सिनेमासाठी कसी झाली ?
-: दिग्दर्शकांना वाटले दरवेळी तेच ते कॅरेक्टर एकमेकांसमोर उभे करण्यापेक्षा आपण नवीन कोणाला तरी घेऊ. आधी सर्व पात्र मराठीतच होती पण मग त्यांच्या कॅरेक्टरला बंगाली टच देण्यात आला. त्यामुळे एक फ्रेश लुक आला अन प्रेमाला भाषेचे बंधन नसते हेच यातून दिसते.

 ६. पुर्वी तुम्ही वेगळ््या भुमिकेतच प्रेक्षकांसमोर आला होतात आता एकदम अशा बोल्ड अंदाजात येताना तुम्हाला काय वाटते ?
 -: मला खुपच छान वाटतय. याआधी मी खुपच गंभीर भुमिका केल्या आहेत. आता अशी भुमिका करताना मस्त वाटतय. मी अवंतीका मध्ये देखील बोल्ड होतेच की. पण या सिनेमातील नायिका विचारांनी बोल्ड आहे. ही भुमिका आजची आहे जशी मी आहे तशीच यात दिसेल . तीने स्वत:चा डिसीजन घेतला आहे. पण कोणाला जुमानत नाही असे बिलकुलच नाही. ती अजुनही दुसºयांचा विचार करते. 
.............................................................................................
    

Web Title: Looks good when playing a bold guess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.