पाहा... कुशल बद्रिकेचे अनुभवाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 09:49 AM2017-01-30T09:49:55+5:302017-01-30T15:19:55+5:30

कुशलने बद्रिके नुकतेच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे.

Look ... the experience of the skilled man | पाहा... कुशल बद्रिकेचे अनुभवाचे बोल

पाहा... कुशल बद्रिकेचे अनुभवाचे बोल

googlenewsNext
 
पल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कुशल बद्रिके  सोशलमीडियावरदेखील प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. हो, कारण कुशलने नुकतेच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे. हा संदेश फक्त लग्न झालेल्या मुलांसाठी आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तर पाहा त्याचा हा व्हिडीओ...

कुशलने या व्हिडीओच्या माध्यमातून बायकोपुढे आपली फिलॉसॉफी मांडली आहे. कुशल म्हणतो, जगाच्या पाठीवर आपल्या या ज्या पाच भिंती आहेत ना, त्या तेवढया आपल्या आहेत. यावर त्याची बायको म्हणते, आपल्या घराच्या तर पाचच भिंती असतात. यावर कुशल म्हणतो, पाचवी फेसबुकवॉल... वॉल आहे ना शेवटी भिंतच. यावर कुशलची बायको त्याचे काय हाल करते हे या व्हिडीओमध्ये पाहण्यासारखे आहे. म्हणूनच कुशलने हा व्हिडीओ अपलोड करून एक पोस्ट शेअर केली आहे. तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, अनुभवाचे बोल, बायकोपुढे फिलॉसॉपी मांडू नये. 

      कुशलच्या या व्हिडीओला सोशलमीडियावर भरभरून पसंती मिळत आहे. तसेच जबरदस्त, कडक, लय भारी यासोबतच अनेक गंमतीशीर कमेंन्टदेखील पाहायला मिळत आहे. या अभिनेत्याने आपल्या विनोदीशैलीन प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. तसेच अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातूनदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याने एक होता खाऊ, एका वरचढ एक, भाऊचा धक्का, जत्रा, बॉयस्कोप असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच सध्या तो चला हवा येऊ दया या कॉमेडी शोच्या माध्यमातून सगळयांना आपल्या प्रेमात पाडण्यास मजबूर केले आहे. तसेच जागो मोहन प्यारे, लाली लीला अशा नाटकाच्या माध्यमातूनदेखील आपल्या अभिनयाची चुणूक रंगभूमीवर दाखविली आहे. 










Web Title: Look ... the experience of the skilled man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.