ललित प्रभाकर व हृता दुर्गुळेचे जुळलेत छत्तीस गुण, 'आरपार'मधील गाण्यातून दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:54 IST2025-09-04T18:54:03+5:302025-09-04T18:54:38+5:30

Lalit Prabhakar And Hruta Durgule: ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळेच्या 'आरपार' सिनेमातील 'छत्तीस गुण' हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. आणि या गाण्याने साऱ्यांना वेड लावलं आहे.

Lalit Prabhakar and Hruta Durgule's thirty-six qualities together, a glimpse from the song 'Aarpar' | ललित प्रभाकर व हृता दुर्गुळेचे जुळलेत छत्तीस गुण, 'आरपार'मधील गाण्यातून दिसली झलक

ललित प्रभाकर व हृता दुर्गुळेचे जुळलेत छत्तीस गुण, 'आरपार'मधील गाण्यातून दिसली झलक

लग्न म्हटलं की पती-पत्नीचे किती गुण जुळलेत याकडे अधिक भर दिला जातो. आणि हो, अगदी छत्तीस गुण जुळलेत असं फार कमी पाहायला मिळतं. पण ही कमी आता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि हृता दुर्गुळे(Hruta Durgule)ने भरुन काढलीय. ललित आणि हृताच्या 'आरपार' (Aarpar Movie) सिनेमातील 'छत्तीस गुण' (Chhattis Guun Song) हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. आणि या गाण्याने साऱ्यांना वेड लावलं आहे. प्रेमाची परिभाषा सगळ्यांसाठी निराळी असते, पण खरं प्रेम हे नेहमीच कितीही अडचणी आल्या तरी सफल होतंच याची अनेक उदाहरणे आहेत आणि ललित आणि हृताच्या 'आरपार' चित्रपटाने आणखी एक उदाहरण सेट केलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. 

लग्न मंडपातच कुटुंब, मित्रपरिवारासह नवरा नवरीचा तुफान डान्स असलेलं छत्तीस गुण हे गाणं सर्व वऱ्हाडी मंडळींना थिरकायला भाग पाडतंय. ललित-हृताचा हा धुमाकूळ साऱ्यांनाच आवडला असून चित्रपटातील हे गाणं मनावर अधिराज्य गाजवतंय. हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध आहे. अवधूत गुप्तेची सर्वच गाणी रसिकांना थिरकायला लावणारी असतात, आणि आरपारमधील छत्तीस गुण हे गाणंही साऱ्यांना वेड करणार आहे. या गाण्याच्या संगीताची जबाबदारी गुलराज सिंग यांनी सांभाळली आहे. तर गाण्याचे बोल मनोज यादव यांचे आहेत. 


'लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव. नि. काटकर आणि रितेश. मो. चौधरी निर्मित 'आरपार' हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Lalit Prabhakar and Hruta Durgule's thirty-six qualities together, a glimpse from the song 'Aarpar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.