​‘लाल इश्क’ ने घेतला ‘सैराट’चा धसका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 14:39 IST2016-05-29T09:09:31+5:302016-05-29T14:39:31+5:30

मराठी चित्रपट क्षेत्रात ‘सैराट’ने मोठा इतिहास रचला असून सध्या या चित्रपटाची एवढी क्रेझ आहे की नविन मराठी चित्रपट रिलीज ...

'Lal Ishq' took out 'sarat' | ​‘लाल इश्क’ ने घेतला ‘सैराट’चा धसका?

​‘लाल इश्क’ ने घेतला ‘सैराट’चा धसका?

ाठी चित्रपट क्षेत्रात ‘सैराट’ने मोठा इतिहास रचला असून सध्या या चित्रपटाची एवढी क्रेझ आहे की नविन मराठी चित्रपट रिलीज करतानाही मराठी दिग्दर्शकांना विचार करावा लागत आहे. या आठवड्यात २७ मेला संजय लीला भन्साळी यांचा लाल इश्क हा सिनेमा प्रदर्शित होतोय.


‘सैराट’मुळे ‘लाल इश्क’नेही धसका घेतल्याचे चित्रपटसृष्टीत सध्या बोलले जात आहे. कारण सैराटला जबरदस्त मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ६ मे रोजी त्यानंतर १३ मे रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २० मेला पैसा पैसा झळकला खरा मात्र सैराटपुढे या चित्रपटाचे काही चालले नाही.

 सैराटमय झालेले प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सैराट ने मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे विक्रम प्रस्थापित केलेत. सैराटची बॉक्स आॅफिसवर घोडदौड सुरु असताना इतर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनावर मोठा परिणाम पाहायला मिळतोय. सैराटमुळे अनेक मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकल्या गेल्या. २९ एप्रिल रोजी सैराट चित्रपटगृहामध्ये रिलीज करण्यात आला. अख्ख्या भारतातच नव्हे तर, विदेशातील मराठी चाहत्यांनी ‘सैराट’ला डोक्यावर धरले आहे.

Web Title: 'Lal Ishq' took out 'sarat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.