कुमार सानू लावणार हलके हलके चित्रपटाला चार चाँद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 11:47 IST2016-12-27T10:41:55+5:302016-12-27T11:47:51+5:30

मराठी चित्रपटसृष्ट्री ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचली असल्याचे यावर्षी पाहायला मिळाले. सैराट आणि नटसम्राट या चित्रपटांनी करोडोंचा गल्ला बॉक्सआॅफिसवर ...

Kumar Sanu, the lightest movie, has four moon | कुमार सानू लावणार हलके हलके चित्रपटाला चार चाँद

कुमार सानू लावणार हलके हलके चित्रपटाला चार चाँद

ाठी चित्रपटसृष्ट्री ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचली असल्याचे यावर्षी पाहायला मिळाले. सैराट आणि नटसम्राट या चित्रपटांनी करोडोंचा गल्ला बॉक्सआॅफिसवर कमविला आहे. त्याचप्रमाणे कित्येक बॉलिवुडच्या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्ट्रीचे कौतुक केले आहे. तसेच मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छादेखील बोलवून दाखविली आहे. एवढेच नाही तर बॉलिवुडची तगडी अभिनेत्री विदया बालन हिने मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदापर्ण केले आहे. आता हेच पाहा ना, २०१६ हे वर्ष निरोप घेत असले तरी मराठी चित्रपटसृष्ट्रीत प्रेक्षकांना सरप्राईज मिळणे काय थांबले नाही. आता, बॉलिवुडचा तगडा गायक कुमार सानू हा मराठी चित्रपटात एक रोमँण्टिक गाणं गाणार आहे. हे  या चित्रपटाचे नाव हलके हलके असे आहे. ब्रम्हांडनायक मुव्हीज या निर्मितीसंस्थेचा हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी कुमार सानू यांनी नुकतेच हे रोमँण्टिक गाणं रेकॉर्ड केले आहे. या गाण्याचे बोल हलके हलके बोलणे असे आहे. चित्रपटाच्या निर्मात्या ए. अनूराधा यांचे हे गायिका म्हणून पहिले गाणे असले तरी त्यांनी कुमार सानू यांना मोलाची साथ दिली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू अंजूटे यांनी केले आहे. या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. यापूर्वी या दिग्दर्शकाने ढोल ताशे या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले होते. तसेच या चित्रपटात कोण कलाकार असणार आहेत हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. ए.आर.फिल्मसच्या ए अनूराधा आणि ब्रम्हांडनायक मुव्हीजच्या स्मिता अंजूटे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे मात्र नककी. 

Web Title: Kumar Sanu, the lightest movie, has four moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.