​कुमार सानू गाणार हॉस्टेल डेज या चित्रपटासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 10:25 AM2017-06-30T10:25:25+5:302017-06-30T15:55:25+5:30

हिंदीच्या तुलनेत प्रादेशिक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी बनवली जात आहेत असे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे म्हणणे आहे. प्रादेशिक ...

Kumar Sanu Ghan for the Hosteller Days film | ​कुमार सानू गाणार हॉस्टेल डेज या चित्रपटासाठी

​कुमार सानू गाणार हॉस्टेल डेज या चित्रपटासाठी

googlenewsNext
ंदीच्या तुलनेत प्रादेशिक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी बनवली जात आहेत असे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे म्हणणे आहे. प्रादेशिक गाण्यांचे बोल खूपच चांगले असतात. तसेच या गाण्यांना संगीतही खूप चांगले दिले जाते. या गाण्याच्या संगीताला त्या प्रादेशिक भाषेचा टच असतो. त्यामुळे मी प्रादेशिक भाषेत गाणे अधिक पसंत करतो असेही कुमार सानू सांगतात. 
कुमार सानू आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गायले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी हलके हलके या चित्रपटासाठी देखील गाणे रेकॉर्ड केले होते. आता ते हॉस्टेल डेज या चित्रपटात गाणार आहेत.
हॉस्टेल डेज या चित्रपटात ते एक रोमँटिक गाणे गाणार आहेत आणि हे गाणे मंदार चोळकरने लिहिले आहे. मंदारनेच या गाण्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितले आहे.
हॉस्टेल डेज या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अतिशय आनंदित असलेली मुले-मुली आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या सोबतच आयुष्यातले सगळ्यात मस्त क्षण अशी या चित्रपटाची टॅगलाइन आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळाली होती.
हॉस्टेल डेज या चित्रपटाद्वारे आपण 90च्या दशकात जाऊन काही जुन्या आठवणींमध्ये रमणार आहोत. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला काळ या चित्रपटामुळे तुम्हाला पुन्हा आठवणार आहे यात काही शंका नाही असे या चित्रपटाच्याबाबत अजय नाईक यांनी म्हटले होते. 
हॉस्टेल डेज या चित्रपटात प्रेक्षकांना प्रार्थना बेहरे एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रार्थना एक खूप चांगली आणि प्रोफेशनल अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करायला मजा आली असे अजय नाईक यांनी म्हटले आहे. यासोबतच विद्याधर जोशीदेखील या चित्रपटात आहेत. विद्याधर जोशी यांच्यासोबत अजय यांचा हा तिसरा चित्रपट आहे. त्यांनी याआधी सतरंगी रे आणि बावरे प्रेम हे या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Also Read : ​हॉस्टेल डेजमध्ये झळकणार प्रार्थना बेहरे

Web Title: Kumar Sanu Ghan for the Hosteller Days film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.