'कोती'चे पहिले स्पेशल स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:19 IST2016-01-16T01:09:24+5:302016-02-13T01:19:09+5:30

समलिंगी संबंध, ट्रान्सजेंडर आदी विषयांवर भाष्य करणारा 'कोती' हा चित्रपट सुहास भोसले यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे पहिले ...

'Koti' first special screening | 'कोती'चे पहिले स्पेशल स्क्रिनिंग

'कोती'चे पहिले स्पेशल स्क्रिनिंग

लिंगी संबंध, ट्रान्सजेंडर आदी विषयांवर भाष्य करणारा 'कोती' हा चित्रपट सुहास भोसले यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे पहिले स्पेशल स्क्रिनिंग येत्या रविवारी दुपारी 3 वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात राहणार्‍या निष्पाप मुलाच्या ट्रान्सजेंडर करण्याच्या कल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे.

या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी, शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे, आरटीआयचे संजय पाचंगे, आशीर्वाद संस्थेचे पन्ना गाभारे आणि चार चौकच्या गौरी सावंत उपस्थित राहणार आहेत. डॉ. संतोष पोटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, ओम आर्ट्स सादर करणार आहे. राजेश दुर्गे यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

या चित्रपटात मुदशिंगकर, दिव्येश मेडगे, विनीता काळे आणि संजय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची इफ्फीमध्येही निवड करण्यात आली आहे.
 

Web Title: 'Koti' first special screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.