"कदाचित त्या दिवशी आयुष्यात येऊन मला" केदार शिंदेंनी स्वामी समर्थांविषयी व्यक्त केला भक्तीभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:50 IST2025-07-03T14:49:56+5:302025-07-03T14:50:06+5:30

केदार शिंदे यांनी स्वामी समर्थांबरोबर सुरू झालेला २८ वर्षांचा प्रवास त्यांच्या छोट्याशा पोस्टमधून सांगितला आहे.

Kedar Shinde Shared A Post About Swami Samarth Expresses Devotion Spiritual Story | "कदाचित त्या दिवशी आयुष्यात येऊन मला" केदार शिंदेंनी स्वामी समर्थांविषयी व्यक्त केला भक्तीभाव

"कदाचित त्या दिवशी आयुष्यात येऊन मला" केदार शिंदेंनी स्वामी समर्थांविषयी व्यक्त केला भक्तीभाव

Kedar Shinde Swami Samarth Spiritual Story: "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे ब्रीद असण्याऱ्या स्वामी समर्थांची प्रचिती देणारी अनेक उदाहरणं तुम्ही वाचली असतील. स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवतात अशी एक श्रद्धा भाविकांची असते. सिनेसृष्टीतही श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) अनेक भक्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कित्येकदा बोलताना किंवा मुलाखतींमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे किंवा समर्थांच्या दृष्टांतांचे अनेक किस्से ऐकवले आहेत. अनेक सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावानं श्री स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करतात. लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे ( Kedar Shinde) हे स्वामी समर्थांचे भक्त ( Swami Samarth) आहेत हे आजवर सर्वांना माहिती आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

केदार शिंदे यांची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे.  नेहमीच ते स्वामींच्या चरणी स्वत: नतमस्तक होताना आपण पाहिलं आहे. हेच पुन्हा एकदा दिसून आलंय. केदार शिंदेंनी यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत केदार यांच्यामागे स्वामी समर्थांचा फोटो दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहलं, "श्री स्वामी समर्थ महाराज की जय. १९९७ रोजी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तोवर मला ठाऊक नव्हतं तुमच्याविषयी. कारण आमच्या घराण्यात कुणीही तुमची सेवा भक्ती केली नव्हती. ती संधी तुम्ही मला दिलीत. मार्ग दाखवला".


पुढे त्यांनी लिहलं, "माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तुम्ही नसतात तर कदाचित मी नसतोच. कारण खुप स्थित्यंतर या वर्षात घडली. आज २८ वर्षे पुर्ण होतायत. श्वासाच्या शेवट तुमच्या नामानेच व्हावा हीच तुमच्या पायी प्रार्थना. आज व्यावसायिक रंगभूमीवर माझं गाजलेल नाटक आमच्या सारखे आम्हीच यालाही २८ वर्षे पुर्ण झाली. कदाचित त्याच दिवशी आयुष्यात येऊन मला जाणीव करून दिलीत तुम्ही... आमच्या सारखे आम्हीच", या शब्दात केदार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी 'श्री स्वामी समर्थ' अशा कमेंट केल्यात. 
 

Web Title: Kedar Shinde Shared A Post About Swami Samarth Expresses Devotion Spiritual Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.