केदार आणि भारत काय करतायेत दिवाळीत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 15:33 IST2016-10-22T15:33:58+5:302016-10-22T15:33:58+5:30
केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी चित्रपट असो किंवा नाटक प्रेक्षकांसाठी खास ...

केदार आणि भारत काय करतायेत दिवाळीत ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी चित्रपट असो किंवा नाटक प्रेक्षकांसाठी खास मेजवानी नेहमीच घेऊन येते. भरत आणि केदार हे दोघे एकमेकांचे जिवलग मित्र असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. केदारच्या चित्रपटात भरत दिसला नाही तर नवलच म्हणावे लागेल. भरत जर मुख्य भूमिकेत नसेल तर तो केदारच्या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका तरी करतोच. आता या जोडीने नाट्यरसिकांसाठी एक खास नाटक आणले आहे. सौजन्याची ऐशीतैशी असे या नाटकाचे नाव आहे. विशेष म्हणजे हे नाटक दिवाळीच्या मुहुर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे नुकतेच दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरवर आपल्याला भरत जाधव हटके लुकमध्ये दिसत आहे. परंतु यामध्ये भरतची नायिका कोण असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडणार असणार. कि यामध्ये नायिकाच नाही असे देखील बºयाच जणांना हे पोस्टर पाहुन वाटले असेल. तर या नाटकामध्ये आपल्याला अभिनेत्री स्मिता गोंदकर देखील पाहायला मिळणार आहे. स्मिताचे हे पहिलेच नाटक आहे. या नाटकाचे लेखन वसंत सबनीस यांचे आहे. तर निर्मिती अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे यांनी केली आहे. आता स्मिता आणि भरतची मस्त जोडी या नाटकात काय कमाल करते हे बघायचे असेल तर आपल्याला दिवाळीची वाट पाहावी लागणार आहे. भरत-केदारच्या जोडीने रंगभूमीवर अनेक नाटके रंगविली आहेत. ही जोडी एकत्र आली कि नक्कीच काहीतरी भन्नाट आणि वेगळे नाटक पाहायला मिळणार असा विश्वास प्रेक्षकांमध्ये आहे.
![]()