'कारखानीसांची वारी' निघाली टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला

By तेजल गावडे | Published: September 29, 2020 07:32 PM2020-09-29T19:32:22+5:302020-09-29T19:33:13+5:30

प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघने त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर खुशखबरी दिली आहे.

'Karkhanisanchi Wari' goes to Tokyo International Film Festival | 'कारखानीसांची वारी' निघाली टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला

'कारखानीसांची वारी' निघाली टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघने त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर खुशखबरी दिली आहे. ती म्हणजे लवकरच त्याचा नवा चित्रपट भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाची निवड ३३व्या टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. या चित्रपटाचे नाव आहे कारखानीसांची वारी. ही माहिती अमेयने चित्रपटाचा पोस्टर शेअर करून इंस्टाग्रामवर दिली आहे.

अमेय वाघने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करत लिहिले की, नवीन चित्रपट तयार आहे आणि तो टोकिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलाय. आम्ही कारखानीसांची वारी चित्रपटाची टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्यामुळे खूप उत्सुक आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश जोशीने केले आहे. चित्रीत आणि निर्मिती अर्चना बोऱ्हाडेने केली आहे.

कारखानीसांची वारी चित्रपटात अमेय वाघसोबत गीतांजली कुलकर्णी, मोहन आगाशे, मृण्मयी देशपांडे, प्रदीप जोशी, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले आणि अजित अभ्यंकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


अमेय वाघच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर  दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.अमेय अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गर्लफ्रेंड सिनेमात दिसला होता. तसेच तो आसुर या वेबसीरिजमध्ये देखील झळकला होता.

Web Title: 'Karkhanisanchi Wari' goes to Tokyo International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.