श्रुती आणि गौरवची जमली जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 11:47 IST2016-12-03T11:47:46+5:302016-12-03T11:47:46+5:30
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सनई चौघडे वाजवू लागले आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नगाठी बांधत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता चिराग ...
.jpg)
श्रुती आणि गौरवची जमली जोडी
स ्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सनई चौघडे वाजवू लागले आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नगाठी बांधत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता चिराग पाटील, मृण्मयी देशपांडे यांच्यापाठोपाठ आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रुती मराठे ही लवकरच अभिनेता गौरव घाटणेकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या जोडीने तीन वर्षापूर्वी तुझी माझी लव्हस्टोरी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाच्या माध्यमातूनच यांच्यातदेखील जवळीकता निर्माण झाली असल्याचे समजत आहे. तीन वर्षाच्या रिलेशननंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली जाणार आहे. अखेर रिल लाईफ जोडी रिअल लाइफमध्ये उतरणार आहे. श्रुती यापूर्वी राधा ही बावरी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तर अभिनेता गौरव घाटणेकरदेखील तुझविन सख्या रे मालिकेतून प्रेक्षकांच्या लाडका बनला आहे. मालिकेनंतर या दोघांची ही गाडी सुसाट निघाली असल्याचे पाहायला मिळाले. श्रुतीने रमा माधव, मुंबई पुणे मुंबई २, सत्य, सावित्री आणि सत्यवान, तुझा बाप त्याचा बाप असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तसेच तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट्रीमध्येदेखील आपली जागा निर्माण केली आहे. त्याचबरोबर नुकतेच तिचे बॉलिवुडमध्येदेखील पदापर्ण झाले होते. तिने बुधिया सिंग बॉर्न टू रन हा चित्रपट केला आहे. यामध्ये ती बॉलिवुडचा तगडा कलाकार मनोज वाजपेयीसोबत झळकली होती. तर गौरवदेखील नुकताच वजनदार या चित्रपटातून डॉक्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच तो मिस्टर अॅण्ड मिस्टर या नाटकमधूनदेखील प्रेक्षकांना दिसत आहे. अशी ही मराठी इंडस्ट्रीची सुंदर जोडी ४ डिसेंबररोजी विवाहबंधनात अडकणार आहे.