Itemgiri Marathi Rap Song: यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स'प्रमाणे डॅनी सिंगही गाणार मराठी रॅप साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 12:43 IST2017-01-25T05:50:22+5:302017-01-25T12:43:36+5:30

बॉलिवूडमधील इतर लोकप्रिय गायकांप्रमाणेच आता  रॅपर यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या यंग जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणाता ...

Itemgiri Marathi Rap Song: Yo Yo Honey Singh, Badshah, Speed ​​and Topmost 'Rappers', Danny Singh will sing Marathi rap song | Itemgiri Marathi Rap Song: यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स'प्रमाणे डॅनी सिंगही गाणार मराठी रॅप साँग

Itemgiri Marathi Rap Song: यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स'प्रमाणे डॅनी सिंगही गाणार मराठी रॅप साँग

लिवूडमधील इतर लोकप्रिय गायकांप्रमाणेच आता  रॅपर यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या यंग जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणाता क्रेज पाहायला मिळते आहे. पाश्चिमात्य देशातून आलेला ‘रॅप’ गाण्यांचा हा प्रकार आपल्या भारतात हिट होताना दिसत आहे.त्यामुळेच रॅपर यो यो हनीसिंगनेही रॅप गाणे गात मराठीतही दमदार पदार्पण केले.त्यानंतर हिंदीप्रमाणे मराठी रसिकांवर आपल्या आवाजाची मोहिनी टाकण्यासाठी बादशाह,रफ्तार हे रॅपर लोकप्रिय रॅपरही मराठीकडे वळल्याचे पाहायला मिळाले.या रॅपरप्रमाणेच ''डोप बॉय आशी,इश्क बॉय डॅनी, घेवून आलेत तुमच्यासाठी आयटमगिरी अरे आयटमगिरी'' असे म्हणत  डॅनी सिंगचे मराठी रॅप गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. 

विशेष म्हणजे, नवनवीन प्रयोग आणि संकल्पना आत्मसात करण्यात नेहमीच तत्पर असलेल्या आपल्या मराठी इंडस्ट्रीतदेखील  रॅप गाण्याचा हा फंडा चांगलाच गाजतो  आहे.मराठीत सध्या गाजत असलेले ‘आयटमगिरी’ हे रॅपसॉंग त्यातलेच एक म्हणावे लागेल. डॅनी सिंग याने गायलेले हे रॅपसॉंग तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडत आहे. मराठी- हिंदी फ्युजन असलेले हे गाणे, प्रत्येकाच्या होठावर चांगलेच रुळलेले दिसून येत असून, ‘आयटमगिरी’ या विडीयो साँगच्या निमित्ताने मराठीत रॅपसॉंगचा नवा ट्रेंड रुजू झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अर्थात यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये याचा वापर केला असला तरी, एक संपूर्ण गाणे ‘रॅप’ मध्ये गाण्याचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. एस. के. व्हिजन्स निर्मित आणि इंद्रनील नुकडे दिग्दर्शित या रॅपसॉंगला आशिष किशोर यांनी ताल दिला आहे. शिवाय हे गाणे अधिक अट्रॅक्टीव्ह बनवण्यासाठी सहदिग्दर्शक ऐश्वर्या जैन आणि स्नेहल उभे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.त्यामुळे फक्त यंग जनरेशनच नाहीतर वयोवृध्दांपर्यंत भुरळ पाडणा-या या रॅपसॉंगला नेटीझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, हे साँग लवकरच प्रसिद्धीचा उच्चांक गाठेल,यात शंका नाही.

 

Web Title: Itemgiri Marathi Rap Song: Yo Yo Honey Singh, Badshah, Speed ​​and Topmost 'Rappers', Danny Singh will sing Marathi rap song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.