अवधूत झाला 'फॅन' मध्ये शामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 02:25 IST2016-02-25T09:25:02+5:302016-02-25T02:25:02+5:30
मराठी इंडस्ट्रीचे नशीब खूपच फळफळत चाललेआहे. कोणाची बॉलीवुड तर कोणाची हॉलीवुड एंट्री होत आहे.आता तर चक्क, गायक अवधुत गुप्तेच ...
.jpg)
अवधूत झाला 'फॅन' मध्ये शामील
राठी इंडस्ट्रीचे नशीब खूपच फळफळत चाललेआहे. कोणाची बॉलीवुड तर कोणाची हॉलीवुड एंट्री होत आहे.आता तर चक्क, गायक अवधुत गुप्तेच शाहरूखच्या फॅन मध्ये सामील झालेला दिसतो. सद्या किंग खानच्या 'फॅन' या चित्रपटातील जबरा हे गाणे फार चर्चेत असल्याचे दिसते. पण या गाण्याच्या स्वरूपात फॅन या चित्रपटाचे अधिक प्रमोशन व्हावे यासाठी यशराज फिल्मने हे गाणे सहा विविध भाषांमध्ये प्रदर्शित केले आहे. यामध्ये मराठी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हे गाणे हिट झाले आहे. तर जबरा फॅन हे गाणे मराठीमध्ये अवधुत गुप्ते याने गायले आहे. या स्टार गायकाचे जबरा हे मराठी व्हिजन ऐकून असेच म्हणावे वाटते की, जबरा फॅन हूॅ में अवधूत का!